Durand Cup : Muhammed Nemil of FC Goa during a training session. Dainik Gomantak
क्रीडा

Durand Cup : जमशेदपूरचे भवितव्य एफसी गोवाच्या हाती

Durand Cup : स्पर्धेच्या ब गटात आज महत्त्वपूर्ण लढत

दैनिक गोमंतक

पणजीः जमशेदपूर एफसी (Jamshedpur FC) संघाचे 130व्या ड्युरँड कप (Durand Cup) फुटबॉल स्पर्धेतील भवितव्य एफसी गोवा (FC Goa) संघ ठरविणार आहे. कोलकाता येथील विवेकानंद युबा भारती क्रीडांगणावर शुक्रवारी होणारा ब गट सामना झारखंडमधील संघासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ब गटात एफसी गोवा संघाने दोन्ही सामने जिंकून अगोदरच उपांत्यपूर्व फेरीत जागा निश्चित केली आहे. या गटातून बाद फेरीतील दुसऱ्या जागेसाठी आर्मी ग्रीन व जमशेदपूर एफसी यांच्यात चुरस आहे. दोन्ही संघांचे समान तीन गुण आहेत. त्यात गोलसरासरी 0 असल्याने आर्मी ग्रीन संघाचे पारडे वरचढ आहे. जमशेदपूरची गोलसरासरी -1 आहे. चांगल्या गोलसरासरीने जमशेदपूरने एफसी गोवास हरविले, तर त्यांना बाद फेरीत जागा मिळू शकते. त्यावेळी जमशेदपूरच्या संघाला शुक्रवारीच होणाऱ्या आर्मी ग्रीन आणि सुदेवा दिल्ली यांच्यातील लढतीवर अवलंबून राहावे लागेल. एफसी गोवाने जमशेदपूरला हरविले, तसेच आर्मी ग्रीन संघाला सुदेवा दिल्लीविरुद्ध पराभूत व्हावे लागले, तरीही सेनादलाच्या संघाला पुढील फेरीत जागा मिळेल. कारण हेड-टू-हेड लढतीत साखळी फेरीत आर्मी ग्रीन संघाने जमशेदपूरला 3-1 फरकाने हरविले होते. सामना बरोबरीत राहिला तरीही आर्मी संघाची वाटचाल कायम राहील.

एफसी गोवा बलवान संघ ः विल्सन

जमशेदपूर एफसी व एफसी गोवा हे संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेतील प्रतिस्पर्धी आहेत. उद्याच्या लढतीविषयी जमशेदपूरचे प्रशिक्षक नोएल विल्सन यांनी सांगितले, की ‘‘एफसी गोवा हा स्पर्धेतील बलवान संघ आहे. उद्याचा सामना आमच्या संघासाठी अनुभवाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आम्ही कुठे आहोत याची जाणीव होईल. आमच्या संघातील खेळाडूंचे वय लक्षात घेता, त्यांच्यासाठी ही आगळी संधी आहे. आशा करतो, की नवोदित संधीचा लाभ घेत चांगला निकाल नोंदवतील.’’

एफसी गोवाचा प्रयोगास नकार

एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी उद्याच्या लढतीत जास्त प्रयोग करण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले, ‘‘आमच्यासाठी ही स्पर्धा मोसमपूर्व तयारी आहे, त्यामुळे आम्ही जास्त प्रयोगावर भर देणार नाही. काही बाबींवर आम्हाला मेहनत घ्यायची आहे. वेगवेगळ्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आमचे नियोजन बदलत असते, तरीही प्रयोगासाठी ही योग्य वेळ नाही.’’ जमशेदपूर संघात नवोदितांचा भरणा असला, तरी त्यांचा संघ चांगला आहे. सुदेवा दिल्लीविरुद्धची त्यांची लढत आम्ही पाहिली होती. जमशेदपूर संघ नियोजनबद्ध खेळतो, विस्कळित खेळ करत नाही. त्यादृष्टीने जागा हेरून नियंत्रण मिळविण्यासाठी आम्हाला तयारी करावी लागेल. त्यांच्याविरुद्धचा सामना आमच्यासाठी तयारीच्या दृष्टीने समर्पक आहे, असेही फेरांडो यांनी नमूद केले.

योजनाबद्ध खेळावर भर

जमशेदपूरविद्धच्या लढतीविषयी फेरांडो म्हणाले, की ‘‘गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळणार की नाही याबाबत आम्ही विचार करत नाहीत. योजनाबद्ध खेळ करणे जास्त महत्त्वाचे आहे. अर्थात, संघ या नात्याने प्रत्येक वेळी सामन्यात तीन गुण हेच आमचे ध्येय असते. चांगला खेळ आवश्यक आहे हे आम्हाला विसरता येणार नाही, त्यानंतरच तीन गुण मिळतील. गटात अव्वल स्थानी राहिल्यास आनंदच होईल.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT