FC Goa Players Dainik Gomantak
क्रीडा

Durand Cup 2023: एफसी गोवासमोर चेन्नईयीनचा अडथळा

गुवाहाटी येथे शनिवारी उपांत्यपूर्व लढत

किशोर पेटकर

Durand Cup 2023 Quarter Final Match: एफसी गोवा संघ 132व्या ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत ‘ड’ गटात अपराजित राहिला, आता पुढील आगेकूच राखण्यासाठी त्यांना शनिवारी (ता. २६) आयएसएल स्पर्धेतील पारंपरिक प्रतिस्पर्धी चेन्नईयीन एफसीचा अडथळा पार करावा लागेल.

एफसी गोवा आणि चेन्नईयीन एफसी यांच्यातील उपांत्यपूर्व सामना गुवाहाटी येथे खेळला जाईल. इंदिरा गांधी ॲथलेटिक स्टेडियमवर साखळी फेरीत एफसी गोवाने दोन विजय नोंदविले, तर एक सामना बरोबरीत राखला.

या मैदानावर सलगपणे खेळण्याचा अनुभव गोव्यातील संघासाठी फायदेशीर ठरू शकतो. एफसी गोवाने शिलाँग लाजाँगला ६-० असे, तर डाऊनटाऊन हिरोजला ३-० असे हरविले. नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्धचा सामना २-२ असा गोलबरोबरीत राहिला.

चेन्नईयीन एफसी संघही ‘ई’ गटात अपराजित राहिला. त्यांनी ओळीने तिन्ही सामने जिंकून आत्मविश्वास प्रबळ केला.

हैदराबाद एफसी, दिल्ली एफसी आणि नेपाळमधील त्रिभुवन आर्मी एफसी संघाला नमवून चेन्नईच्या संघाने थाटात बाद फेरी गाठली.

संघाचा आत्मविश्वास उंचावलाय : ब्रँडन

मोसमाची सुरवात चांगली झालेली आहे, त्यामुळे आमचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत झाली आहे. हाच जोश कायम राखत आयएसएल स्पर्धेसाठी मजबूत तयारी करण्याचे उद्दिष्ट आहे, असे एफसी गोवाचा कर्णधार ब्रँडन फर्नांडिसने शुक्रवारी सांगितले.

ड्युरँड कप स्पर्धेत एफसी गोवासमोर चेन्नईयीनचे खडतर आव्हान असेल. या संघाने साखळी फेरीत उल्लेखनीय खेळ केला आणि चांगल्या फॉर्ममध्ये खेळत असल्याने कठीण आव्हान पार करावे लागेल ही बाब ब्रँडनने मान्य केली. फक्त विजय हेच आपल्या संघाने ध्येय आहे, असे सांगण्यास ब्रँडन विसरला नाही.

नवा खेळाडू खेळण्याचे संकेत

एफसी गोवाचा नवा परदेशी करारबद्ध खेळाडू आयर्लंडचा कार्ल मॅकह्यू शनिवारी महत्त्वाच्या सामन्यात खेळण्याचे संकेत आहेत. स्पर्धेत हॅटट्रिकसह चार गोल केलेला मोरोक्कन आंतरराष्ट्रीय नोआ सदोई याच्यावर एफसी गोवाची मदार असेल.

साखळी फेरीत स्पॅनिश कार्लोस मार्टिनेझ व रॉलिन बोर्जिस यांनी प्रत्येकी दोन गोल करून छाप पाडली आहे. एफसी गोवाने बचावफळीत ओडेई ओनाइंडिया व संदेश झिंगन यांच्या समावेशाने भक्कम कामगिरी प्रदर्शित केली. साखळी फेरीत माजी ड्युरँड कप विजेत्या संघाने फक्त दोन गोल स्वीकारले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT