Rohan Bopanna lost in US Open final. Dainik Gomantak
क्रीडा

Rohan Bopanna: इतिहास घडविण्याचे स्वप्न भंगले, रोहन बोपन्नानाचा US Open च्या अंतिम फेरीत पराभव

यूएस ओपन 2023 मध्ये डबल्सच्या अंतिम फेरीत भारताच्या रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन या जोडीला अमेरिकेच्या राजीव राम आणि ब्रिटनच्या जो सॅलिस्बरी यांनी पराभवाची धूळ चारली.

Ashutosh Masgaunde

Dream of making history shattered, Rohan Bopanna lost in US Open final:

यूएस ओपन 2023 मध्ये डबल्सच्या अंतिम फेरीत, भारताच्या रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन या जोडीला अमेरिकेच्या राजीव राम आणि ब्रिटनच्या जो सॅलिसबरी यांनी 2-6, 6-3, 6-4 अशा फरकाने पराभूत केले.

43 वर्षीय बोपण्णा पुरुष दुहेरीच्या ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. दोन वेळचे चॅम्पियन राजीव राम आणि जो सॅलिसबरी यांनी पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर शानदार पुनरागमन केले आणि शेवटी विजय मिळवण्यात यश मिळविले.

या विजयासह राजीव राम आणि जो सॅलिसबरी या जोडीने सलग तिसऱ्यांदा यूएस ओपन चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावण्यात यश मिळविले.

43 वर्षीय बोपण्णा ओपन एरामधील सर्वात वयस्कर ग्रँडस्लॅम विजेता बनू शकला असता परंतु आर्थर अॅशे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील पराभवाने त्याचे स्वप्न भंगले. हा सामना दोन तासांहून अधिक काळ चालला.

सर्वात वयस्कर टेनिसपटू म्हणून ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्याचा विक्रम नेदरलँड्सच्या जीन-ज्युलियन रॉजरच्या नावावर आहे. जीन-ज्युलियन रॉजरने 2022 फ्रेंच ओपनमध्ये 40 वर्षे आणि नऊ महिने वयाच्या मार्सेलो अरेव्होलासह पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकले

या पराभवानंतर बोपण्णाची पुरुष दुहेरीतील पहिले ग्रँडस्लॅम जिंकण्याची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. दुसरीकडे, राम आणि सेल्सबरी ही युएएस ओपन सलग तीन वेळा जिंकणारी पहिली जोडी ठरली आहे.

रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन या जोडीला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला असला तरी या दोन खेळाडूंनी उपांत्य फेरीत शानदार खेळ केला.

सहाव्या मानांकित भारतीय-ऑस्ट्रेलियन जोडीने यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत फ्रेंच जोडीचा 7-6 (7-3), 6-2 असा पराभव केला.

उपांत्य फेरीत, रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन या जोडीने यूएस ओपनच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत पियरे-ह्युग्स हर्बर्ट आणि निकोलस माहूत या फ्रेंच जोडीवर सरळ सेटमध्ये विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

बोपण्णा त्याच्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा यूएस ओपनची फायनल खेळत होता. आणि सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून तो प्रथमच या स्पर्धेचा भाग होता. 2010 मध्ये तो पाकिस्तानी जोडीदार ऐशम-उल-हकसोबत फायनलमध्ये पोहोचला होता. त्याला ब्रायन बंधूंच्या दिग्गज जोडीकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

एकूणच बोपण्णाची ही तिसरी ग्रँडस्लॅम फायनल होती. बोपण्णाने आतापर्यंत केवळ एक ग्रँडस्लॅम जिंकली आहे. 2017 मध्ये, त्याने कॅनडाची खेळाडू ग्राबरिला डॅब्रोव्स्कीसह फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीचे विजेतेपद जिंकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: साखळी नगरपालिकेवर सौरऊर्जा प्रकल्प; पालिकेला मिळणार 30 केव्ही वीज

SCROLL FOR NEXT