Sandeeo warlikar Dainik Gomantak
क्रीडा

Goa Sport Department: क्रीडामंत्र्यांच्या सल्लागाराची अखेर उचलबांगडी; आदेश जारी

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन समिती समन्वयक पदावरूनही हकालपट्टी

किशोर पेटकर

Advisor To Sports Minister Released From His Duty: गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सेवेतील प्रशिक्षकाची क्रीडामंत्री गोविंद गावडे यांचा सल्लागार या पदावरून उचलबांगडी झाली, शिवाय 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन समिती समन्वयक पदावरूनही हकालपट्टी करण्यात आली.

यासंबंधी आदेश प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक डॉ. गीता नागवेकर यांनी 16 ऑगस्टच्या तारखेने डॉ. संदीप मार्टिन वरळीकर यांच्यासदर्भात जारी केला.

गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सेवेतील महिला क्रीडा अधिकारी छळप्रकरणी (GF MLA Vijai Sardesai had raised this issue in assembly during Sports' Demand) फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी यावेळच्या राज्य विधानसभेत आवाज उठविला होता. या प्रशिक्षकावर लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप असूनही त्याला सेवेत बढती मिळते, तो सेवेत कायम राहतो याबद्दल आमदार सरदेसाई यांनी विचारणा करून क्रीडामंत्री गावडे यांना धारेवर धरले होते.

संबंधित प्रशिक्षकावर कारवाई केली नाही, तर आपण पंतप्रधानांना पत्र लिहिणार असल्याचा इशाराही आमदार सरदेसाई यांनी राज्य विधानसभेत बोलताना दिला होता. हा प्रशिक्षक आपण राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचा प्रमुख असल्याचा दावा करत असल्याबद्दलही आमदार सरदेसाई यांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

आमदार सरदेसाई यांनी आरोप केलेल्या प्रशिक्षकाची क्रीडामंत्री गावडे पाठराखण करत असल्याचेही विधानसभेत स्पष्ट झाले होते. त्याची क्रीडासाठी सेवा आवश्यक असल्याचे क्रीडामंत्र्यांचे म्हणणे होते.

राष्ट्रीय स्पर्धा आयोजनातूनही बाहेर

गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालकांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे, की क्रीडा, कला व संस्कृती यांच्या कार्यालयातून मंत्र्यांच्या (क्रीडा) १० ऑगस्ट २०२३ रोजीच्या लेखी सुचनेनुसार प्रशिक्षक डॉ. संदीप मार्टिन वरळीकर (Sandeeo warlikar) (श्रेणी-२) यांना कला व संस्कृती मंत्र्यांच्या कार्यालयातून सल्लागार म्हणून बजावत असलेल्या सेवेतून मुक्त करण्यात आले आहे.

तसेच २१-१०-२०२२ रोजी बजावलेल्या आदेशानुसार त्यांना तत्काळ संबंधित प्रशिक्षण सेवा बजवावी लागेल. याशिवाय, राष्ट्रीय स्पर्धा आयोजन समिती (एनजीओसी) कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांचे समन्वयक म्हणून डॉ. संदीप वरळीकर यांना देण्यात आलेला ताबा त्वरित मागे घेण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT