Goa Crime News : तामिळनाडूत गंडा घालणाऱ्या एकाला गोव्यात अटक; दोन राज्यांच्या पोलिसांची संयुक्त कारवाई

इतर गुन्ह्यांमध्ये संशयित आरोपी दीर्घकाळापासून फरार होता
Old Goa and Tamil Nadu Police traced Accused
Old Goa and Tamil Nadu Police traced AccusedDainik Gomantak
Published on
Updated on

Old Goa Police and Tamil Nadu Police traced absconding Cheating accused: तमिळनाडूत गंडा घालणाऱ्या एका संशयिताला गोव्यात अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ओल्ड गोवा पोलिसांनी व तामिळनाडू पोलिसांनी संयुक्त रित्या केली. संशयिताने तब्बल 300 ग्राहकांना 40 लाखांना गंडा घातला होता.

Old Goa and Tamil Nadu Police traced Accused
Goa ST Reservation: 2027च्या विधानसभा निवडणूकीत ST समाजाला आरक्षण देण्यास केंद्राचा नकार

ओल्ड गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितावर तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

संशयित राजेशने एक स्कूटर बुक करण्यासाठी सुमारे 300 ग्राहकांकडून 40 लाख रुपये उकळले व राजेश जमा केलेले पैसे घेऊन पळून गेला. संशयिताविरुध्द तमिळनाडूतील अन्य पोलीस स्थानकात अशा अन्य गुन्हेगारी प्रकरणात तो फरार होता.

Old Goa and Tamil Nadu Police traced Accused
Job Vacancy: गोवा मानव संसाधन विकास महामंडळात नोकरीची संधी; 370 जागांसाठी थेट मुलाखत

संशयित गोव्यात असल्याची माहिती कोईम्बतूर पोलिसांनी ओल्ड गोवा पोलिसांना दिली. माहिती प्राप्त होताच ओल्ड गोवा पोलिसांच्या दोन पथकांनी शोधमोहीम राबवली. पोलिसांनी खोर्ली, ओल्ड गोवा, दोनापावला, करंजाळे येथे संशयिताचा शोध घेतला.

अखेर संशयिताला त्याच्या राहत्या घराजवळ ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यात वापरलेली कारही पोलिसांनी जप्त केली. संशयित तामिळनाडू नोंदणीकृत नंबर प्लेट बदलून गोवा नोंदणीकृत वापरत होता. त्याच्याकडून कर्नाटकच्या इतर नंबर प्लेटही जप्त करण्यात आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com