R Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

WTC 2023 Final मधील पराभवानंतर आर अश्विनची आली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, 'पराभव निराशाजनक, पण...'

WTC Final मध्ये भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आर अश्विनला न खेळवण्याबद्दल मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. आता यानतंर त्याची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

Pranali Kodre

R Ashwin React after India lost WTC 2023 Final Against Australia: कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला पराभूत करत पटकावले. द ओव्हल मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात अखेरच्या दिवशी म्हणजेच रविवारी (11 जून) ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी विजय मिळवला.

दरम्यान, या अंतिम सामन्यात भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये न खेळवण्याबद्दल कर्णधार रोहित शर्मा आणि संघव्यवस्थापनेला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही याबद्दल ट्वीट करत नाराजी व्यक्त केली होती.

पण आता अंतिम सामन्यानंतर अश्विनने ट्वीट करत त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ऑस्ट्रेलियन संघाचे अभिनंदन करताना म्हटले आहे की भारतीय खेळाडूंचेही कौतुक व्हायला हवे.

अश्विनने ट्वीट केले आहे की 'कसोटी चॅम्पियशीपचा अंतिम सामना जिंकल्याबद्दल आणि या कसोटी स्पर्धेच्या या पर्वाचा शेवट करण्याबद्दल अभिनंदन. पराभूत संघाच्या बाजूला असणे निराशाजनक असते. पण तरीही इथपर्यंत अव्वल येण्यासाठी गेल्या 2 वर्षात केलेला प्रयत्न शानदार होता.'

'सर्व गोंधळ आणि टीकेदरम्यान मला वाटते की या पर्वात खेळलेल्या माझ्या सर्व संघसहकाऱ्यांचे आणि सर्वात महत्त्वाचे सर्वात मोठा आधार ठरलेल्या प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे कौतुक करणे गरजेचे आहे.'

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आर अश्विन कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. त्याने या स्पर्धेत 61 विकेट्स घेतल्या आहेत. असे असतानाही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये न खेळवल्याबद्दल अनेक दिग्गजांनी टीका केली होती.

दरम्यान, अश्विनला भारतीय संघव्यवस्थापनाने इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजीला पोषक वातारण लक्षात घेता खेळवले नव्हते. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज असे संमिश्रण खेळवण्यात आले होते. फिरकी गोलंदाज म्हणून रविंद्र जडेजा याला संधी देण्यात आलेली.

कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर

आर अश्विन सध्या कसोटी क्रमावारीत गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 92 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 474 विकेट्स घेतल्या आहेत. तो कसोटी सर्वाधिक विकेट्स घेणारा भारताचा अनिल कुंबळेनंतरचा (619 विकेट्स) दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

SCROLL FOR NEXT