ISL football  Dainik gomantak
क्रीडा

दिएगो मॉरिसियोचे आयएसएलमध्ये पुनरागमन

मुंबई सिटीने मॉरिसियोशी 31 मेपर्यंत करार केला आहे

दैनिक गोमन्तक

पणजी : गतविजेत्या मुंबई सिटी एफसीने करारबद्ध केल्यामुळे ब्राझीलियन आघाडीपटू दिएगो मॉरिसियो याला आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (football) स्पर्धेत पुनरागमन करण्याची संधी लाभली. तो स्पर्धेसाठी गोव्यात (goa) दाखल झाला असून कोविडविषयक सक्तीचे विलगीकरण संपवून मुंबईच्या संघात रुजू होईल.

मुंबई सिटीने मॉरिसियोशी 31 मेपर्यंत करार केला आहे. या कालावधीत तो आयएसएल स्पर्धेतील बाकी सामने, तसेच एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळेल. गतमोसमात (2020-21) तो ओडिशा एफसीतर्फे आयएसएल स्पर्धेत खेळला होता.

मुंबई सिटीचे मुख्य प्रशिक्षक डेस बकिंगहॅम यांनी नव्या खेळाडूचे संघात स्वागत केले आहे. त्याचा या स्पर्धेतील मागील अनुभव क्लबसाठी फायदेशीर ठरेल, असे त्यांनी नमूद केले. मुंबई सिटीशी करार करण्यापूर्वी मॉरिसियोने कतारमधील द्वितीय विभागीय संघ अल शाहानियाकडून खेळताना नऊ सामन्यांत आठ गोल नोंदविले.

मुंबई सिटीचा ब्राझीलियन खेळाडू य्गोर कातातौ याने संघ सोडण्याचे ठरविल्यामुळे परदेशी खेळाडूची एक जागा रिक्त झाली होती. कातातौ याने 11 सामन्यांत तीन गोल केले होते. तो मादुरैरा एस्पोर्ते या आपल्या मूळ संघात परतला आहे. ‘‘भारतात पुन्हा परतताना मला आनंद झाला असून गतविजेत्या मुंबई सिटीशी करार केल्यामुळे खूष आहे.

आयएसएलमधील गतमोसमातील अनुभव चांगला होता, तरीही भारतात मला अजून भरपूर काही साध्य करायचे आहे. मुंबई सिटीसारख्या संघात दाखल झाल्यामुळे अपेक्षाही वाढल्या आहेत. मैदानात उतरण्यासाठी मी सज्ज आहे,’’ असे मॉरिसियो याने सांगितले. गतमोसमातील 20 आयएसएल सामन्यांत त्याने 12 गोल व 2 असिस्टची नोंद केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

SCROLL FOR NEXT