पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट विजेतेपदासाठी जीनो स्पोर्टस क्लबसमोर धेंपो क्रिकेट क्लबचे आव्हान असेल. तीन दिवसीय अंतिम सामना बुधवारपासून (ता. 11) पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर खेळला जाईल. (Dhempo Cricket Club's challenge in front of Gino Sports Club )
स्पर्धेच्या दोन्ही उपांत्य सामने रविवारी अनिर्णित राहिले आणि अंतिम फेरीत दाखल झालेल्या संघांना पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर आगेकूच राखणे शक्य झाले. सांगे येथील जीसीए मैदानावर अमोघ देसाईचे द्विशतक सात धावांनी हुकले. समर दुभाषीने अर्धशतक केले. त्यामुळे साळगावकर क्लबच्या 155 धावांना उत्तर देताना जीनो क्लबने पहिल्या डावात 7 बाद 463 धावा केल्या. 308 धावांच्या भक्कम आघाडीमुळे जीनो क्लबने विजेतेपदाचा दावा कायम ठेवला.
दीपराज गावकरची आक्रमकता
कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर सामन्याच्या शेवटच्या दिवशी चुरस दिसली. हर्षद गडेकरच्या अर्धशतकामुळे कालच्या 8 बाद 385 वरून धेंपो क्लबने पहिल्या डावात 464 धावा केल्या आणि करिमाबाद क्लबवर 99 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी प्राप्त केली. नंतर दीपराज गावकरच्या आक्रमक अर्धशतकामुळे करिमाबाद क्लबने दुसरा डाव 6 बाद 220 धावांवर घोषित केला. पहिल्या डावात खणखणीत 178 धावा केलेल्या दीपराजने दुसऱ्या डावात अवघ्या 28 चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 70 धावा केल्या. याशिवाय कश्यप बखलेनेही अर्धशतक केले. विजयासाठी 122 धावांचा पाठलाग करताना धेंपो क्लबने 22 षटकांत 2 बाद 96 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
साळगावकर क्रिकेट क्लब, पहिला डाव : 155 अनिर्णित विरुद्ध जीनो स्पोर्टस क्लब, पहिला डाव (3 बाद 336 वरून) : 146.1 षटकांत 7 बाद 463 घोषित (अमोघ देसाई 193, समर दुभाषी नाबाद 50, प्रज्ञेश गावकर नाबाद 22, समित आर्यन मिश्रा 1-89, किथ पिंटो 2-140, यश पोरोब 3-51, वैभव नाईक 1-5).
करिमाबाद क्रिकेट क्लब, पहिला डाव : 365 व दुसरा डाव : 36 षटकांत 6 बाद 220 घोषित (कश्यप बखले 58, आलम खान 41, दीपराज गावकर 70, फरदीन खान 3-50, जय आहुजा 2-59) अनिर्णित विरुद्ध धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव (8 बाद 3 वरून) : 132.5 षटकांत सर्वबाद 464 (हर्षद गडेकर 63) व दुसरा डाव : 22 षटकांत 2 बाद 96 (करण वशोदिया नाबाद 37, जय आहुजा नाबाद 43, बलप्रीत छड्डा 2-33)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.