Ishaan Gadekar
Ishaan Gadekar Dainik Gomantak
क्रीडा

Bandodkar Trophy: करिमाबादला विजेतेपदासाठी धेंपो क्लबचे कडवे आव्हान

किशोर पेटकर

पणजी: बांदोडकर करंडक टी-20 क्रिकेट (T20 Cricket) स्पर्धेत विजेतेपदासाठी करिमाबाद क्रिकेट क्लबसमोर धेंपो क्रिकेट क्लबचे आव्हान असेल. पणजी जिमखान्याच्या या स्पर्धेतील अंतिम सामना मंगळवारी (ता. २४) कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर खेळला जाईल. (Dhempo Cricket Club will face Karimabad Cricket Club for the title in Bandodkar Trophy T20 Cricket Tournament)

स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील दोन्ही सामने सोमवारी झाले. अवघ्या २५ धावांत ५ गडी टिपलेल्या रिषभ चौबे याच्या भेदक गोलंदाजीसमोर साळगावकर क्लबचा (Salgaonkar Club) डाव गडगडला आणि करिमाबाद क्लबने १७ धावांनी विजय प्राप्त केला. पहिल्या पाच चेंडूंत दोघे फलंदाज गमावल्यानंतर साळगावकर क्लबला १४६ धावांचे आव्हान झेपलेच नाही. ईशान गडेकर एकहाती लढत देताना ६५ धावा केल्या, पण त्या विजयासाठी पुरेशा ठरल्या नाहीत.

दिव्यांगची अष्टपैलू चमक

धेंपो क्लबने दिव्यांग हिंगणेकर (नाबाद २९, २-३३) याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर चौगुले क्लबला १० धावांनी हरविले. कर्णधार दर्शन मिसाळ फलंदाजी करत असताना चौगुले क्लबला विजयाची संधी होती, मात्र तो बाद झाला आणि १६८ धावांच्या आव्हानासमोर चौगुले क्लबला ७ बाद १५७ धावाच करता आल्या. ३१ चेंडूंत तीन चौकार व दोन षटकारांसह ५० धावा केलेल्या डावखुऱ्या दर्शनला दिव्यांगने मलिक सिरूर याच्याकरवी झेलबाद केले, तेव्हा चौगुले क्लबला विजयासाठी २१ चेंडूंत ३८ धावांची गरज होती व सहा विकेट बाकी होत्या, पण धेंपो क्लबवर वर्चस्व राखणे त्यांना जमले नाही. त्यापूर्वी, मुकुल कसाना व अझीम काझी यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या ९१ धावांच्या भागीदारीमुळे धेंपो क्लबला ६ बाद १६७ धावांची मजल मारला आली होती.

संक्षिप्त धावफलक

करिमाबाद क्रिकेट क्लब ः २० षटकांत ९ बाद १४५ (अझान थोटा २२, तुनीष सावकार २७, सोहम पानवलकर ४०, दीपराज गावकर २२, शुभम तारी १-३५, समीत आर्यन मिश्रा ३-२५, सागर मिश्रा १-१८, देवदत्त चोडणकर ३-३५) वि. वि. साळगावकर क्रिकेट क्लब ः १९ षटकांत सर्वबाद १२८ (ईशान गडेकर ६५, वैभव नाईक १३, आदित्य सूर्यवंशी १९, किथ पिंटो १४, रिषभ चौबे ४-१-२५-५, दीपराज गावकर २-२१, रिषभ चौहान १-२१, सचिन मिश्रा १-१४).

धेंपो क्रिकेट क्लब ः २० षटकांत ६ बाद १६७ (मुकुल कसाना ४२, अझीम काझी ४७, विकास सिंग २३, दिव्यांग हिंगणेकर नाबाद २९, मलिक सिरूर १२, फेलिक्स आलेमाव २-२८, सुशील बुर्ले २-४१, कृष्णन उन्नी १-३८, दर्शन मिसाळ १-२०) वि. वि. चौगुले स्पोर्टस क्लब ः २० षटकांत ७ बाद १५७ (राहुल मेहता ३४, एकनाथ केरकर १२, पियुष यादव ३८, दर्शन मिसाळ ५०, दिव्यांग हिंगणेकर २-३३, हर्षद गडेकर ३-२२, विकास सिंग २-२४).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT