Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Panaji Goa: भाऊ एकच भाऊसाहेब बांदोडकर असे म्हणत या संतप्त व्यक्तीने भाऊंना थेट चर्चेसाठी देखील आव्हान दिले.
Shripad Naik
Shripad Naik

Panaji Goa

लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील विविध अस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत. यात हॉटेल, रेस्टॉरंट यासह मद्य विक्रीची दुकाने देखील बंद ठेवण्यात आली आहेत.

यावरुन पणजीतील एक मतदार थेट भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांच्याशीच भिडला. या मतदाराने हॉटेल बंद असल्याचा राग नाईक यांच्यावर काढत केस काळे केले म्हणून कोणी भाऊ होत नाही, भाऊ एकच भाऊसाहेब बांदोडकर असेही या संतापलेला मतदार म्हणाला.

श्रीपाद नाईक मतदान केंद्र भेटीदरम्यान पणजीत आले असता या मतदाराने हॉटेल बंद का आहेत? असा प्रश्न केला. दरम्यान, श्रीपाद नाईक यांनी या व्यक्तीसोबत हात मिळविण्यासाठी पुढे केला असता त्यांने हात मिळवण्यास नकार दिला.

एवढेच नव्हे तर कोणी केस काळे केले म्हणून भाऊ होत नाही, भाऊ एकच भाऊसाहेब बांदोडकर असेही हा व्यक्ती म्हणाला. या संतप्त व्यक्तीने भाऊंना थेट चर्चेसाठी देखील आव्हान दिले. मात्र, नाईक सोबत असलेल्या कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळावरुन निघून गेले.

या व्यक्तीने तो बाबुश मोन्सेरात यांना समर्थन करत असल्याचे देखील सांगितले.

Shripad Naik
Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

प्रसारमाध्यमांशी बोलताना या व्यक्तीने हॉटेल बंद का ठेवलीयेत असा प्रश्न केला. मला भूक लागली असून, आता भजी कोठे मिळतील? असेही या संतप्त मतदाराने प्रश्न केला.

रमाकांत खलप यांनी देखील श्रीपाद नाईक यांनी खुल्या चर्चेसाठी आव्हान दिले होते मात्र, त्यांनी ते मान्य केले नाही असेही, या संतप्त व्यक्तीने यावेळी सांगितले. दरम्यान, सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com