Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Lok Sabha Election Live News and Update in Marathi (07 May 2024): लोकसभा मतदान, राज्यभरात मतदानास सुरुवात, गोव्यातील ठळक बातम्यांचा आढावा.
112 year old Women casts her vote in goa
112 year old Women casts her vote in goa

112 वर्षांच्या आजीचा विक्रम

112 year old Women casts her vote in goa

112 वर्षांच्या आजीबाईने लोकसभा निवडणुकीत केले मतदान. मुळगाव येथील हिराबाई नागेश परब या वयोवृद्ध महिलेने केला विक्रम. शिरोडवाडी मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क.

112 year old Women casts her vote in goa
112 year old Women casts her vote in goa

सायंकाळी पाच वाजेपर्यंत गोव्यात 72.52 टक्के मतदान

Goa Voting Turnout

गोव्यात सायंकाळी वाजेपर्यंत दोन्ही मतदारसंघात मिळून 72.52 टक्के मतदान. उत्तर गोव्यात 73.51 टक्के तर दक्षिणेत 71.55 टक्के मतदानाची नोंद.

Goa Voting Turnout
Goa Voting TurnoutDainik Gomantak

राज्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Voting Turnout

गोव्यात दुपारी तीन वाजेपर्यंत दोन्ही मतदारसंघात मिळून 61.39 टक्के मतदान. उत्तर गोव्यात 61.28 टक्के तर दक्षिणेत 61.50 टक्के मतदानाची नोंद.

मुख्यमंत्री दक्षिणेत; कामतांसोबत दिल्या मतदान केंद्रांना भेट

CM Pramod Sawant

मुख्यमंत्री प्रमोद सावंत दक्षिण गोव्यात दाखल झाले असून, त्यांनी आमदार दिगंबर कामत यांच्यासह दक्षिणेतील विविध मतदान केंद्रांना भेट दिल्या.

CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

शीतपेय नव्हे उष्ण पेय

निवडणूक आयोगातर्फे मतदानाचा टक्का वाढवा यासाठी मतदारांना मतदार केंद्रावर शित पेयाची सोय केली. शितपेयांचे बॉक्स आणले पण ते थंड कशामध्ये करणार? असा प्रश्न केंद्रावरील अधिकाऱ्यांना पडला. मतदारांना नाईलाजास्तव शितपेयाच्या बाटल्या उष्णपेय म्हणून घ्याव्या लागल्या.

Goa Loksabha Election: Voters had to take soft drink bottles as hot drinks.
Goa Loksabha Election: Voters had to take soft drink bottles as hot drinks.Dainik Gomantak

सत्तरीत विश्वजीत राणेंचे एकतर्फी वर्चस्व कायम!

सत्तरी तालुक्यात मंत्री विश्वजीत राणेंचे एकतर्फी वर्चस्व कायम. जिथे बाबा (विश्वजीत) तिथे आम्ही. श्रीपाद भाऊंना मोठे मताधिक्य देऊ. सावर्डे पंचायतीच्या कुडशे बुथवरील युवकांचा निर्धार.

Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak

गोव्यात दुपारी एकपर्यंत 49.04 टक्के मतदान

गोव्यात दोन्ही लोकसभा जागांसाठी दुपारपर्यंत एकूण 49.04 टक्के मतदान. उत्तर गोव्यात 48.88 तर दक्षिणेत 49.20 मतदानाची नोंद.

मतदान यंत्रात बिघाड; मळा, पणजी येथे 45 मिनिट मतदान थांबले

Mala-Panaji

मळा-पणजी येथे मतदान यंत्रात बिघाड झाल्याने तब्बल ४५ मिनिटे मतदान प्रक्रिया थाबंली होती. मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली.

गोव्यात सकाळी सात ते अकरापर्यंत 30.90 टक्के मतदान

Goa Total Voting Turnout Upto 11 AM

राज्यात दोन्ही मतदारसंघात सकाळी सात ते अकरापर्यंत एकूण 30.90 टक्के मतदान. उत्तेरत 30.31 तर दक्षिणेत 31.56 टक्के मतदानाची नोंद.

Shripad Naik
Shripad NaikDainik Gomantak

मुख्यमंत्री सावंत यांचे सपत्नीक मतदान

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पत्नी सुलक्षणा सावंत यांचे कोठंबी साखळी येथील मतदान केंद्रावर मतदान. मतदानाचा वाढता कल हा विकसित भारतला मिळणारा प्रतिसाद असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

CM Pramod Sawant With Wife Sulakshana
CM Pramod Sawant With Wife SulakshanaDainik Gomantak

राज्यपालांनी बजावला मतदानाचा हक्क

गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सपत्नीक दोना पाऊला येथील प्राथमिक शाळेत बजावला मतदानाचा हक्क.

विजय सरदेसाई यांनी बजावला मतदानाचा हक्क

गोव्यात सकाळी नऊपर्यंत 13.02 टक्के मतदान

Total Vote Turnout Upto 9 AM In Goa

राज्यात दोन्ही मतदारसंघात सकाळी नऊपर्यंत एकूण 13.02 टक्के मतदान. उत्तेरत 12.80 तर दक्षिणेत 13.24 टक्के मतदानाची नोंद.

डिचोलीतील मतदान केंद्रावरील मतदान यंत्रात बिघाड

Bicholim Voting Center

डिचोली शहरातील एका मतदान केंद्रावरील मतदान यंत्रात सुरवातीलाच बिघाड. सुमारे 27 मिनिटे मतदान प्रक्रिया रखडली. यंत्रातील दोष दूर केल्यानंतर मतदान सुरु.

Bicholim Voting Center
Bicholim Voting CenterDainik Gomantak

पल्लवी धेंपे यांनी सहपरिवार बजावला मतदानाचा हक्क

Dempo Family Cast Vote

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ उमेदवार पल्लवी धेंपे, पती श्रीनिवास धेंपे आणि कन्या गिरिजा धेंपे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Pallavi Dempo with Family
Pallavi Dempo with FamilyDainik Gomantak

गोव्यात मतदानास सुरुवात 

Goa Loksabha Election Voting

गोव्यात मतदानास सुरुवात झाली असून, विविध मतदान केंद्रावर मतदार हजेरी लावत आहेत.

Goa Loksabha Election Voting Center
Goa Loksabha Election Voting CenterDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com