Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

Goa Eco-Friendly Booth Video: गो ग्रीनचा संदेश देणारे मतदान केंद्र राज्यातील विविध ठिकाणी उभारण्यात आली आहेत.
 Eco-Friendly Booth
Eco-Friendly BoothDainik Gomantak

Goa Eco-Friendly Booth Video

गोव्यात दोन लोकसभा जागांसाठी आज (सात मे) मतदान होत आहे. दोन्ही मतदारसंघातील विविध मतदान केंद्रावर मतदार मतदानासाठी दाखल होत आहेत. राज्यातील वाढते तापमान लक्षात घेता, मतदान केंद्रावर शीतपेय आणि रिफ्रेशमेंटची व्यवस्था करण्यात आलीय.

दरम्यान, राज्यात इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची देखील मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. या केंद्राचा व्हिडिओ आणि फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

साखळी मतदारसंघातील आमोणा मतदान केंद्रावर उभारण्यात आलेल्या इको-फ्रेन्डली व्यवस्थेचा व्हिडिओ निवडणूक आयोगाच्या वतीने शेअर करण्यात आला आहे.

यात नारळाच्या पानांची सजावट करण्यात आली आहे. यासह फुले-फळांची देखील सजावट केलीय. तसेच, मतदान केंद्राच्या बाहेर देखील झावळ्यांच्या स्वागत कमान आणि इतर सजावट करण्यात आली आहे.

तसेच, गोव्यातील आणखी एका इको-फ्रेन्डली मतदार केंद्रावरील फोटो भारतीय निवडणूक आयोगाने शेअर केले आहेत. या मतदारसंघातून Reduce, Reuse And Recycle आणि गो ग्रीनचा संदेश देण्यात आला आहे.

गोव्यात दोन लोकसभा जागांसाठी मतदान होत असून, दुपारी एकपर्यंत 49 टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी बाहेर पडत मतदान केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com