Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Final Vote Turnout: गोव्यातील दोन लोकसभा जागांसाठी आज (मंगळवारी, दि.07 मे) मतदान पार पडले.
Goa Final Vote Turnout
Goa Final Vote TurnoutDainik Gomantak

Goa Final Vote Turnout

गोव्यात दोन लोकसभा जागांसाठी आज (सात मे) मतदान पार पडले. सकाळपासून मतदरांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. दुपारी काहीशी मंदावलेली मतदान प्रक्रियेने पुन्हा चारनंतर पुन्हा वेग घेतला.

राज्यात एकूण 75.20 टक्के मतदानाची नोंद झाली असून, उत्तर गोव्यात 76.54 टक्के तर दक्षिण गोव्यात 73.90 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

Goa Final Vote Turnout
Goa Final Vote TurnoutDainik Gomantak

सांगे तालुक्यातील साळजीणी मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदानाची नोंद झाली आहे. साळजीणी-नेत्रावळी बुथ क्रमांक तीन वरील सर्व 109 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

असे झाले मतदान

1) सकाळी नऊपर्यंत एकूण 13.02 टक्के मतदान. उत्तेरत 12.80 तर दक्षिणेत 13.24 टक्के मतदान.

2) अकरापर्यंत एकूण 30.90 टक्के मतदान. उत्तेरत 30.31 तर दक्षिणेत 31.56 टक्के मतदानाची नोंद.

3) दुपारी एकपर्यंत एकूण 49.04 टक्के मतदान. उत्तर गोव्यात 48.88 तर दक्षिणेत 49.20 मतदानाची नोंद.

4) दुपारी तीन वाजेपर्यंत 61.39 टक्के मतदान. उत्तर गोव्यात 61.28 टक्के तर दक्षिणेत 61.50 टक्के मतदान.

5) पाच वाजेपर्यंत गोव्यात 72.52 टक्के मतदान, उत्तरेत 73.51 टक्के तर दक्षिणेत 71.55 टक्के मतदान.

Goa Final Vote Turnout
Goa Election 2024 Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

दरम्यान, डिचोली शहरातील एका मतदान केंद्रावरील मतदान यंत्रात सुरवातीलाच बिघाड झाल्याने सुमारे 27 मिनिटे मतदान प्रक्रिया रखडली. यंत्रातील दोष दूर केल्यानंतर मतदान पुन्हा सुरु झाले.

तसेच, मळा-पणजी येथे देखील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने तब्बल 45 मिनिटे मतदान प्रक्रिया रखडली होती. यंत्र पूर्ववत झाल्यानंतर पुन्हा मतदान सुरु झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com