CK Nayudu Trophy : स्पर्धेतील विजयासह गोव्याच्या मोहिमेचा समारोप

सी. के. नायडू क्रिकेट : हिमाचल प्रदेशवर तीन विकेट्स राखून मात
CK Nayudu Trophy
CK Nayudu TrophyDainik Gomantak
Published on
Updated on

CK Nayudu Trophy : गोव्याने कर्नल सी. के. नायडू करंडक (25 वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेतील मोहिमेचा समारोप विजयाने केले. विजयासाठीच्या 116 धावांचा पाठलाग करताना घसरगुंडी उडाल्यानंतर त्यांनी हिमाचल प्रदेशला शुक्रवारी सकाळी तीन विकेट्स राखून हरविले. (Goa won in CK Nayudu Trophy cricket match)

CK Nayudu Trophy
गोव्यात खाण काम बंदीचा एक बळी

गोव्याची सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर 6 बाद 99 अशी घसरगुंडी उडाली होती. चौथ्या दिवशी सकाळी पहिल्या षटकात गोव्याने (Goa) आणखी एक गडी गमावला. दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर पाचव्या चेंडूवर रितिक कुमार याने मोहित रेडकरला (0) त्रिफळाचीत बाद केले. त्यानंतर वैभव गोवेकर (17) व आदित्य सूर्यवंशी (5) या नाबाद फलंदाजांनी नंतर गोव्याचा विजय साकारला. त्यांनी दुसऱ्या डावात 7 बाद 119९ धावा केल्या. हिमाचल प्रदेशच्या राघव बाली याने 28 धावांत 4, तर रितिक कुमारने 58 धावांत 3 गडी बाद केले. सामना अळूर-बंगळूर (Bangalore) येथे झाला.

एलिट एफ गटात गोव्याला पहिल्या विजयामुळे सहा गुण मिळाले. त्यांचे तीन लढतीतून सात गुण झाले. गोव्याने केरळविरुद्धचा सामना अनिर्णित राखला, तर उत्तर प्रदेशविरुद्ध पराभव पत्करला. हिमाचल प्रदेशला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. या गटातून बाद फेरी गाठताना उत्तर प्रदेशने केरळला 164 धावांनी हरविले. उत्तर प्रदेशचे 19 गुण झाले, तर केरळचे 10 गुण कायम राहिले.

संक्षिप्त धावफलक

हिमाचल प्रदेश : 193 व 245

गोवा : 323 व 7 बाद 119

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com