Ranji Trophy: सौराष्ट्रला रोखण्याचे गोव्यासमोर आव्हान

Ranji Trophy: विजयासह बाद फेरी गाठण्याचे गतविजेत्यांचे लक्ष्य Goa Saurashtra Challenge Narendra Modi Cricket Stadium Batting
ranji trophy 2022
ranji trophy 2022dainikgomantak

पणजी : गतविजेता सौराष्ट्र संघ रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीसाठी इच्छुक असून गुणतक्त्यात त्यांना मुंबईकडून जोरदार आव्हान आहे. गोव्याविरुद्ध डावाने किंवा दहा गडी राखून विजय नोंदविल्यास सौराष्ट्रला बोनस गुण मिळेल आणि त्यांना संधी राहील, त्याचवेळी ते मुंबई आणि ओडिशा यांच्यातील सामना अनिर्णित राहावा अशी प्रार्थनाही करतील. (Challenge to Goa to stop Saurashtra aas88)

एलिट ड गट साखळी फेरीतील अखेरचे सामने गुरुवारपासून (ता. ३) अहमदाबाद येथे खेळले जातील. सौराष्ट्र (Saurashtra) व गोवा (Goa) यांच्यातील सामना नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (Narendra Modi Cricket Stadium) होईल, तर मुंबई व ओडिशा यांच्यातील सामना याच स्टेडियमच्या ‘ब’ मैदानावर होईल. सध्या गटात मुंबईचे सर्वाधिक ९, सौराष्ट्रचे ८, ओडिशाचे ३, तर गोव्याचा फक्त एक गुण आहे.

ranji trophy 2022
'IPL जगातील बेस्ट लीग', या ऑस्ट्रेलियन खेळाडूने पाक मीडियासमोर उधळली स्तुतीसुमने

गोव्याने ओडिशा व मुंबईविरुद्ध चांगला खेळ करूनही विजय प्राप्त करण्यासाठी जिगर प्रदर्शित केली नाही. ओडिशाविरुद्ध त्यांना आघाडी थोडक्यात हुकली व नंतर अनिर्णित लढतीतून फक्त एक गुण मिळाला. मुंबईविरुद्ध सलग तीन दिवस वर्चस्व राखत पहिल्या डावात १६४ धावांची आघाडी प्राप्त केली, मात्र अखेरच्या दिवशी फलंदाजी (Batting) कमजोर ठरल्यामुळे ११९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. गोव्याच्या संघात मैदानावर समन्वय व कल्पकतेचा अभाव जाणवतो हे दोन्ही लढतीत दिसले. गुरुवारपासून खेळल्या जाणाऱ्या चार दिवसीय लढतीत गोव्याच्या (Goa) संघात काही बदल अपेक्षित आहे. सूर न गवसलेल्या सुमीरन आमोणकर याच्या जागी सलामीला आदित्य कौशिक खेळू शकतो, तसेच गोलंदाजीतही खेळपट्टीनुसार नव्या चेहऱ्यास संधी मिळू शकते.

ranji trophy 2022
ICC T20 Rankings: श्रेयस अय्यरचे बल्ले-बल्ले, विराट टॉप-10 मधून बाहेर !

सौराष्ट्रने पहिल्या लढतीत मुंबईला अनिर्णित निकालावर समाधान मानण्यास भाग पाडले. फॉलोऑननंतर त्यांच्या शेवटच्या विकेटने चिवट किल्ला लढविल्यामुळे मुंबईला विजय नोंदविला आला नाही. ओडिशाविरुद्ध सौराष्ट्रने डाव व १३१ धावांनी दणदणीत विजय नोंदवून बोनस गुणाची कमाई केली. आता गोव्याविरुद्धही दणदणीत विजयासाठी ते प्रयत्नशील असतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com