Devon Conway International Century 2022 

 

Dainik Gomantak

क्रीडा

International Century 2022: घरच्याच मैदानावरती डेव्हॉन कॉनवेने घडवला इतिहास

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी डेव्हॉन कॉनवेने शतक झळकावले आहे.

दैनिक गोमन्तक

न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज डेव्हन कॉनवे (Devon Conway) याच्या बाबतीत यापेक्षा नवीन वर्षाची चांगली सुरुवात कोणती असू शकते. वर्षाचा पहिला दिवस आणि त्याची सुरुवात शतकाने झाली आहे. बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी डेव्हॉन कॉनवेने शतक झळकावले आहे.

डावखुऱ्या फलंदाजाचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. बांगलादेशविरुद्धचे हे त्याचे पहिले कसोटी शतक आहे. तसेच त्याचे न्यूझीलंडमधील (New Zealand) हे पहिलेच कसोटी शतक आहे. याआधी त्याने इंग्लंडमध्ये पदार्पणाच्या कसोटी डावात शतक झळकावले होते. यासह कॉनवे 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा (Devon Conway International Century 2022) पहिला क्रिकेटपटू बनला आहे.

डेव्हॉन कॉनवेने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 186 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या शतकी खेळीत 1 षटकार आणि 14 चौकारांचा समावेश होता. कॉनवेने कारकिर्दीतील केवळ 7व्या कसोटी डावात दुसरे शतक झळकावले. याशिवाय त्याने या काळात 2 अर्धशतकेही झळकावली आहेत. कॉनवेच्या शतकामुळे न्यूझीलंडचा संघ बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे.

कॉनवेने त्याच्या शतकी खेळीदरम्यान दोन उत्कृष्ट भागीदारीही केल्या, ज्याने किवी संघाला लॅथमच्या सुरुवातीच्या धक्क्यातून सोडवण्याचे काम केले. कॉनवेने दुसऱ्या विकेटसाठी विल यंगसोबत (Will Young) 138 धावांची भागीदारी केली. यानंतर त्याने तिसऱ्या विकेटसाठी रॉस टेलरसह (Ross Taylor) स्कोअर बोर्डात 50 धावांची भर घातली.

डेव्हॉन कॉनवे हा बांगलादेशविरुद्ध शतक झळकावणारा चौथा किवी क्रिकेटपटूही ठरला आहे, ज्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्या 7 डावात 4 फिफ्टी प्लस स्कोअर केले आहेत. विशेष म्हणजे घरच्या मैदानावर कॉनवेचा हा पहिलाच कसोटी सामना होता. म्हणजेच एकप्रकारे घरच्या मैदानावर ही त्याची पदार्पणाची कसोटी होती. आणि, ज्या पद्धतीने त्याने कसोटी पदार्पण केले, आता काहीजण घरच्या मैदानावर पहिल्या कसोटीतही त्याच शैलीत खेळताना दिसतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT