भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कसोटी मालिकेनंतर भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी पत्रकार परिषदेत टीम इंडियाची घोषणा केली. या निवडीत सर्वांच्या नजरा टीम इंडियाचा (Team India) नवा मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्मावर होत्या. तो सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये दुखापतीतून सावरत होता. जसप्रीत बुमराहला (Jaspreet Bumrah) वनडे मालिकेसाठी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
18 सदस्यांची टीम जाहीर करण्यात आली
नियोजित वेळेनुसार ही निवड पहिल्या कसोटीनंतर होणार होती, परंतु रोहित शर्माची (Rohit Sharma) फिटनेस चाचणी अद्याप बाकी असल्याने निवडकर्त्यांनी यासाठी पूर्णविराम दिला आहे. खरं तर भारतीय संघाने नुकतेच दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) त्यांच्या घरच्या मैदानावर झालेल्या सेंच्युरियन कसोटीत 113 धावांनी पराभव केला होता. तसेच 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 19 जानेवारीपासून 3 वनडे सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 19 जानेवारीला, दुसरा 21 जानेवारीला आणि त्यानंतर दौऱ्यातील शेवटचा सामना 23 जानेवारीला केपटाऊनमध्ये खेळवला जाईल.
एकदिवसीय मालिकेसाठी संघ: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, पंत, इशान किशन, आर अश्विन, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उप-कप्तान) , भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.