Dempo club Dainik Gomantak
क्रीडा

Football Tournament: धेंपो उच्च माध्यमिक विद्यालयाचा धडाका

मध्य प्रदेश संघावर सहा गोलने एकतर्फी मात

दैनिक गोमन्तक

पणजी: दिल्लीत सुरू असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील सुब्रतो कप 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्ही. धेंपो उच्च माध्यमिक विद्यालयाने धडाकेबाज विजय नोंदविला.

(Dempo Higher Secondary School well played in Subroto Cup under 17 football tournament)

धेंपो उच्च माध्यमिकने मंगळवारी मध्य प्रदेशमधील केबीएचएस स्कूलवर 6-0 अशी एकतर्फी मात केली. काल स्पर्धेत धेंपो उच्च माध्यमिक विद्यालयाने मणिपूरमधील संघाला बरोबरीत रोखले होते. त्यांचे आता दोन लढतीनंतर चार गुण झाले आहेत. बुधवारी मेघालयातील संघाविरुद्ध शेवटचा साखळी सामना होईल. ती लढत जिंकल्यास धेंपो उच्च माध्यमिकला बाद फेरीची संधी राहील, असे शारीरिक शिक्षण शिक्षक चेतन कवळेकर यांनी सांगितले.

धेंपो उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विजयात मर्फी फर्नांडिस याने दोन गोल केले. त्याने अनुक्रमे 27 व 59 व्या मिनिटास गोल नोंदविला. याशिवाय मॅकनेल डायस (12वे), रौनक वळवईकर (23वे), तपन मिंज (25वे) व उत्कर्ष कुडाळकर (55 वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मेष, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींसाठी आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! अचानक धनलाभाचे योग आणि करिअरमध्ये प्रगती निश्चित

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT