ISL Football Tournament: एफसी गोवा धडाकेबाज खेळासाठी सज्ज

केरळा ब्लास्टर्स व ईस्ट बंगाल यांच्यात होणार पहिली लढत
Football tournament
Football tournamentDainik Gomantak

पणजी: कोविड निर्बंधामुळे सलग दोन मोसम इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा रिकाम्या स्टेडियमवर झाली, मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर आल्याने स्टेडियमवर फुटबॉलप्रेमींचे जल्लोषी पुनरागमन होईल आणि त्यामुळे एफसी गोवा संघ आनंदला असून उत्साहित झाला आहे.

(ISL football tournament start on Friday, October 7 in Kochi)

बायो-बबल वातावरण आणि रिकाम्या स्टेडियमवर खेळताना खूपच कठीण ठरले. आता पाठीराखे पुन्हा स्टेडियमवर येत आहेत. चाहत्यांच्या पाठिंब्यासाठी आम्ही आता मानसिकदृष्ट्या सज्ज झालो असून पूर्वीप्रमाणे आमची शैली आकर्षीत राहील, असा विश्वास एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी मंगळवारी सांगितले.

Football tournament
Fifa World Cup 2022 : कतारमध्ये स्थायिक गोमंतकीय मुलीचं फिफासाठी खास थीम साँग

एफसी गोवाचा कर्णधार ब्रँडन फर्नांडिस यानेही आपल्या प्रशिक्षकाच्या मताशी सहमती दर्शविली. दोन मोसम आम्ही चाहत्यांच्या पाठिंब्याला मुकलो. चाहत्याविना फुटबॉल खेळणे खरोखरच अवघड ठरले. आता ते पुन्हा स्टेडियमवर येणार आहेत. आम्ही आता धडाकेबाज खेळासाठी सज्ज झालो आहोत, असे ब्रँडन म्हणाला.

Football tournament
Asia Cup 2022 मध्ये भारतीय महिला संघाची कमाल, सलग जिंकला तिसरा सामना

एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर आगामी मोसमाबाबत आशावादी आहेत. आयएसएल करंडक जिंकणे आव्हानात्मक असेल, तरीही सध्याच्या आमच्या संघाची मजबूत पायाभरणी झाल्याचे रवी यांनी सांगितले. संघ निवडीसाठी यावेळी चांगले पर्याय उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली.

स्पर्धा शुक्रवारपासून सुरू

यावेळच्या आयएसएल स्पर्धेला शुक्रवारी (ता. 7) कोची येथे केरळा ब्लास्टर्स व ईस्ट बंगाल यांच्यातील लढतीने सुरवात होईल. एफसी गोवाचा स्पर्धेतील पहिला सामना 12 ऑक्टोबर रोजी कोलकाता येथे ईस्ट बंगालविरुद्ध होईल. घरच्या मैदानावर फातोर्ड्यात एफसी गोवा पहिला सामना 3 नोव्हेंबरला जमशेदपूर एफसीविरुद्ध खेळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com