Goa Football Tournament Dainik Gomantak
क्रीडा

जीएफए फुटबॉल स्पर्धेत साळगावकरला उपविजेतेपद, एफसी गोवास तिसरे स्थान

Goa Football Tournament : स्पर्धेचे विजेतेपद यापूर्वीच धेंपो स्पोर्टस क्लबने पटकाविले आहे.

Kishor Petkar

पणजी : जीएफए 20 वर्षांखालील तासा गोवा फुटबॉल स्पर्धेत साळगावकर एफसीने उपविजेतेपद मिळविले, तर एफसी गोवास तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. शनिवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर साळगावकर संघाने 2-1 फरकाने निसटता विजय प्राप्त केला. स्पर्धेचे विजेतेपद यापूर्वीच धेंपो स्पोर्टस क्लबने पटकाविले आहे. (GCA Football Competition)

एफसी गोवा संघाने सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटास आघाडी घेतली. मलिकजान कालेगर याने शानदार गोल केला. मात्र नंतर साळगावकर एफसीने मुसंडी मारत पिछाडी भरून काढली. त्यामुळे आघाडी घेतल्याचा एफसी गोवाचा आनंद जास्त काळ टिकला नाही. सहाव्या मिनिटास शुभम शिरवईकर याने साळगावकरला बरोबरी साधून दिली. विश्रांतीपूर्व साळगावकर एफसीला पेनल्टी फटका मिळाला. 45+2व्या मिनिटास उमंग गायकवाडने स्पॉट किकवर अचूक फटका मारत संघाला आघाडी मिळवून दिली. हाच गोल अखेरीस निर्णायक ठरला.

सामन्याच्या उत्तरार्धात एफसी गोवास संधी होत्या, परंतु त्यांना यश प्राप्त झाले नाही. साळगावकर एफसीचा गोलरक्षक विशाल याची दक्ष कामगिरी मौल्यवान ठरली. त्याने 59व्या मिनिटास लालरेमरुआता याचा फटक, तर 66व्या मिनिटास जोव्हियल डायसचे हेडिंग उधळून लावले. त्यानंतरही एफसी गोवाचे खेळाडू विशालचा बचाव भेदू शकले नाहीत. त्यामुळे साळगावकरच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT