Dempo Club loses in GCA Premier League cricket match Dainik Gomantak
क्रीडा

जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यात धेंपो क्लब पराभवाच्या छायेत

'जीनो'विरुद्ध दुसऱ्या डावातही घसरगुंडी; करिमाबादचे 'साळगावकर'वर वर्चस्व

Kishor Petkar

पणजी : जीनो स्पोर्टस क्लबच्या प्रभावी गोलंदाजीसमोर धेंपो क्रिकेट क्लबची दुसऱ्या डावातही घसरगुंडी उडाली, त्यामुळे जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यात ते पराभवाच्या छायेत आले. आणखी एका लढतीत करिमाबाद क्रिकेट क्लबने साळगावकर क्रिकेट क्लबवरील वर्चस्व कायम राखताना आघाडी वाढविली.

सांगे येथील जीसीए मैदानावर जीनो क्लबने पहिल्या डावात 112 धावांची आघाडी प्राप्त केली. नंतर धेंपो क्लबची मंगळवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर 9 बाद 176 अशी दाणादाण उडाली. त्यांच्यापाशी आता 64 धावांचीच आघाडी आहे. पहिल्या डावात 7 गडी बाद केलेला जीनो क्लबचा वेगवान गोलंदाज ऋत्विक नाईक याने दुसऱ्या डावात ३ गडी बाद करून सामन्यात 10 विकेट टिपण्याचा पराक्रम साधला. जीनो क्लबचे फिरकी गोलंदाज अमूल्य पांड्रेकर व मोहित रेडकर यांनीही दुसऱ्या डावात प्रत्येकी 3 गडी बाद केले.

कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर सनत म्हापणे (4-46) याच्या प्रभावी माऱ्यामुळे करिमाबाद संघाला 142 धावांची आघाडी मिळाली. त्यांनी साळगावकर क्लबचा पहिला डाव 103 धावांत गुंडाळला. नंतर दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात 1 बाद 26 धावा करून करिमाबाद क्लबने एकूण आघाडी 168 धावांपर्यंत नेली.

संक्षिप्त धावफलक

धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव : 127 व दुसरा डाव : 53 षटकांत 9 बाद 176 (करण वशोदिया 20, उदित यादव 31, स्नेहल कवठणकर 33, योगेश कवठणकर 16, मलिक सिरूर 42, ऋत्विक नाईक 3-41, अमूल्य पांड्रेकर 3-61, मोहित रेडकर 3-68) विरुद्ध जीनो स्पोर्टस क्लब, पहिला डाव (3 बाद 117 वरून) : 69.1 षटकांत सर्वबाद 239 (अमोघ देसाई 58, समर दुभाषी 35, गौरीश कांबळी 45, मोहित रेडकर 16, अमूल्य पांड्रेकर नाबाद 27, ऋत्विक नाईक 18, हर्षद गडेकर 2-41, जगदीश पाटील 1-40, हेरंब परब 1-22, विकास सिंग 5-71).

करिमाबाद क्रिकेट क्लब, पहिला डाव : 245 व दुसरा डाव : 8 षटकांत 1 बाद 26 (अझान थोटा 17, शुभम तारी 1-6) विरुद्ध साळगावकर क्रिकेट क्लब, पहिला डाव (5 बाद 62 वरून) : 41.5 षटकांत सर्वबाद 103 (वैभव नाईक 22, धीरज यादव 21, शुभम तारी नाबाद 11, लक्मेश पावणे 2-10, सनत म्हापणे 4-46, दीपराज गावकर 2-10, वेदांत नाईक 1-16).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT