WPL 2023 Final Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023 : हरमनप्रीच्या मुंबई इंडियन्सला 'रोहितसेना' करतेय चीअर! मास्टर-ब्लास्टरचीही Final साठी हजेरी

Video: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सच्या महिला संघाला प्रोस्ताहन देण्यासाठी रोहित शर्मासह पुरुष संघातील खेळाडू उपस्थित आहेत.

Pranali Kodre

Delhi Capitals vs Mumbai Indians: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (26 मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होत आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यासाठी अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी हजेरी लावली आहे.

डब्ल्यूपीएलचा हा पहिलाच हंगाम आहे. त्यामुळे रविवारी होत असलेल्या अंतिम सामन्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हा सामना जिंकून पहिला विजेता संघ होण्यासाठी दिल्ली आणि मुंबई प्रयत्नशील आहेत.

दरम्यान या अंतिम सामन्यासाठी भारताचा महान फलंदाज मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपस्थित राहिला आहे. इतकेच नाही, तर मुंबई इंडियन्सचा पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्मा, यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनसह अन्य क्रिकेटपटूही उपस्थित आहेत. मुंबई इंडियन्सचा पुरुष संघ संघाची जर्सी घालून आला असून आपल्या महिला संघाला प्रोत्साहन देत आहे.

विशेष म्हणजे सचिन तेंडुलकर सामन्यादरम्यान स्क्रिनवर दिसताच चाहत्यांनी स्टेडियममध्ये मोठा जल्लोषही केल्याचे पाहायला मिळाले.

स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सचिन तेंडुलकर आणि मुंबई इंडियन्सच्या पुरुष संघाचे व्हिडिओ डब्ल्युपीएलच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरही शेअर करण्यात आले आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की सचिन तेंडुलकरने देखील मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळले आहे.

दरम्यान, जर मुंबई इंडियन्सच्या महिला संघाने डब्ल्यूपीएलचे विजेतेपद जिंकले, तर हा पहिला संघ ठरेल, ज्यांच्या नावावर आयपीएल आणि डब्ल्यूपीएल अशी दोन्ही विजेतीपदे असतील. मुंबई इंडियन्सच्या पुरुष संघाने विक्रमी 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.

तसेच जर दिल्ली कॅपिटल्सच्या महिला संघाने डब्ल्यूपीएलचे विजेतेपद जिंकले, तर हे आयपीएल आणि डब्ल्यूपीएल या दोन्ही स्पर्धेतील मिळून दिल्ली कॅपिटल्सचे हे पहिलेच विजेतेपद असेल. आत्तापर्यंत दिल्ली कॅपिटल्सच्या पुरुष संघाला आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेला नाही.

त्यामुळे आता रविवारी कोणता संघ इतिहास रचणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

डब्ल्यूपीएल अंतिम सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन -

दिल्ली कॅपिटल्स - मेग लेनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, मॅरिझान काप, ऍलिस कॅप्सी, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), मिन्नू मणी, राधा यादव, शिखा पांडे

मुंबई इंडियन्स - यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हेली मॅथ्यूज, नतालिया स्किव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), एमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इजी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, सायका इशाक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT