Delhi Capitals
Delhi Capitals Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: हम तो डूबे सनम...! DC ने गब्बरच्या संघाची 'नौका' बुडवली; लिव्हिंगस्टोनची खेळी व्यर्थ

Manish Jadhav

IPL 2023: आयपीएल 2023 च्या 64 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (DC) पंजाब किंग्जचा (PBKS) 15 धावांनी पराभव केला. धरमशाला मैदानावर दिल्लीने 213/2 अशी मोठी धावसंख्या उभारली आणि पंजाबला 198/8 पर्यंत रोखले.

पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोनने झंझावाती खेळी खेळली. त्याने 48 चेंडूंचा सामना केल्यानंतर 98 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि 9 षटकार मारले.

मात्र, या पराभवामुळे पंजाबचा प्लेऑफचा मार्ग खडतर झाला आहे. पंजाबचा हा सातवा पराभव असून ते 13 सामन्यांतून 12 गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहेत. तर, दिल्ली आधीच प्लेऑफमधून बाहेर पडली आहे.

पंजाबचा त्रास वाढला

पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) या पराभवानंतर अडचणी वाढल्या आहेत. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील हा संघ आता 12 गुणांसह 10 संघांच्या गुणतालिकेत 8 व्या क्रमांकावर आहे. 13 सामन्यांत 5 वा विजय नोंदवल्यानंतर दिल्लीचे 10 गुण आहेत. पंजाबचा अजून एक सामना बाकी आहे, मात्र तो जिंकूनही हा संघ इतर निकालांवर अवलंबून असेल.

लिव्हिंगस्टोनची खेळी व्यर्थ

या सामन्यात लियाम लिव्हिंगस्टोनने पंजाबसाठी खूप प्रयत्न केले, पण त्याला विजय मिळवता आला नाही. चौथ्या क्रमांकावर येऊन लिव्हिंगस्टोनने 48 चेंडूत 98 धावा काढल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 9 षटकार मारले.

तर, अथर्व तायडेने 42 चेंडूत 55 धावा केल्या. अथर्वने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले.

त्याच्याशिवाय, प्रभसिमरन सिंगने 22 धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून इशांत शर्मा आणि एनरिक नोरखियाने 2-2 तर खलील अहमद आणि अक्षर पटेल यांनी 1-1 बळी घेतला.

राईली रोसोच्या बॅटने केला धमाका

तत्पूर्वी, पंजाबचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून दिल्लीला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते.

राईली रोसोच्या 37 चेंडूत नाबाद 82 धावांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) या सामन्यात 2 बाद 213 धावा केल्या. तब्बल एका महिन्यानंतर परतलेल्या पृथ्वी शॉने 54 धावा काढल्या.

तो 20 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. पृथ्वीने 35 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या, जे त्याचे आयपीएलमधील शेवटच्या 13 डावांमधील पहिले अर्धशतक होते.

पृथ्वी शॉचे अर्धशतक

पृथ्वीने आपल्या डावात 38 चेंडू खेळून सात चौकार आणि एक षटकार लगावला. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 31 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांसह 46 धावा काढल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 94 धावा काढल्या, ही या मोसमातील त्यांची सर्वात मोठी भागीदारी आहे.

यानंतर, रोसोने 25 चेंडूत आयपीएलमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याने आपला दक्षिण आफ्रिकेचा सहकारी कागिसो रबाडाला षटकार ठोकून आपले हात उघडले. रबाडाने 3 षटकात 36 धावा दिल्या तर सॅम करनने 36 धावा देत 2 बळी घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT