Delhi Capitals | WPL 2024 PTI
क्रीडा

दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजाला 'ती' चूक पडली महागात, WPL 2024 मध्ये पहिल्यांदाच ठोठावला दंड

Arundhati Reddy fined: दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजावर WPL च्या आचार संहितेचा भंग केल्याने कारवाईही करण्यात आली आहे.

Pranali Kodre

Delhi Capitals Cricketer Arundhati Reddy fined for breaching WPL Code of Conduct

वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धा (WPL) सध्या सुरू असून सुरुवातीलाच रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. असे असतानाच सोमवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध युपी वॉरियर्स सामन्यादरम्यान अरुंधती रेड्डीने केलेल्या चूकीबद्दल तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

अरुंधती दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. तिने या सामन्यात पुनम खेमनारला बाद केले होते. त्यानंतर तिने आक्रमक सेलिब्रेशन केले होते. तिला हेच आक्रमक सेलिब्रेशन आता महागात पडले आहे. याचमुळे तिच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात दंडात्मक कारवाईची ही पहिलीच वेळ आहे.

याबद्दल डब्ल्युपीएलच्या प्रसिद्धी पत्रकात माहिती देण्यात आली आहे. त्यात सांगितले आहे की दिल्ली कॅपिटल्सची क्रिकेटपटू अरुंधती रेड्डीला बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर युपी वॉरियर्स विरुद्ध झालेल्या सामन्यात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी सामना शुल्काच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात येत आहे.'

यात पुढे लिहिले आहे की 'डब्ल्युपीएलच्या आचार संहितेतील कलम 2.5 च्या अंतर्गत लेव्हल 1 ची चूक झाल्याचे अरुंधतीने मान्य केले आहे. हा कलम अयोग्य भाषा, कृती किंवा हावभाव करणे, ज्यामुळे अपमान होईल किंवा ज्यामुळे बाद झालेल्या फलंदाजाकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटण्याच्या शक्यता असते, याबाबत आहे.'

दरम्यान, अरुंधतीवर ही कारवाई झाली असली, तरी सोमवारी झालेल्या सामन्याअत तिच्या संघाने मोठा विजय मिळलला आहे. दिल्लीने युपीला 9 विकेट्सने पराभूत केले आहे. युपीने दिल्लीसमोर अवघे 120 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग दिल्लीने 15 व्या षटकात एकच विकेट गमावत पूर्ण केला होता. दिल्लीचा हा पहिला विजय आहे.

दिल्लीला पहिला सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध अखेरच्या क्षणी पराभूत व्हावे लागले होते. त्या सामन्यात अरुंधतीने 2 विकेट्स घेतल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anjuna Gramsabha: हणजूण मारहाण प्रकरण चिघळले; दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात तक्रार दाखल!

Pilgao Mining Protest: पिळगावचे वातावरण तापले; आंदोलनात महिलांची उडी, तिसऱ्या खनिज वाहतूक बंदच

Indian Coast Guard: अंदमानजवळ बोटीतून सहा हजार किलोचे अमली पदार्थ जप्त, तटरक्षक दलाची कारवाई

Sattari Water Scarcity: सत्तरी तालुका लवकरच टँकरमुक्त, १.५७ कोटी रुपयांची योजना; आमदारांनी सांगितला पुढच्या दोन वर्षांचा प्लान

Goa Live News: बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा 295 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT