Abhishek Porel 23-year-old IPL cricketer arrested in sexual assault case Dainik Gomantak
क्रीडा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Abhishek Porel Arrested Bengal Police: आयपीएलमध्ये 'दिल्ली कॅपिटल्स' संघाकडून खेळणारा आणि बंगालचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेल याला मंगळवारी (11 ऑगस्ट) बंगाल पोलिसांनी बलात्कार आणि धमकावल्याच्या आरोपाखाली अटक केली.

Manish Jadhav

Abhishek Porel Arrested Bengal Police: भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली. आयपीएलमध्ये 'दिल्ली कॅपिटल्स' संघाकडून खेळणारा आणि बंगालचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेल याला मंगळवारी (11 ऑगस्ट) बंगाल पोलिसांनी बलात्कार आणि धमकावल्याच्या आरोपाखाली अटक केली. एका मेडिकल विद्यार्थिनीने दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने हुगळी येथून त्याला ताब्यात घेण्यात आले.

दीर्घ चौकशीनंतर पोलिसांनी त्याला रीतसर अटक केली असून, त्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि त्याला चुंचुडा न्यायालयात हजर करण्यात आले. लग्न करण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा, तसेच प्रायव्हेट व्हिडिओ रेकॉर्ड करुन धमकावल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला.

दरम्यान, या प्रकरणाला काही आठवड्यांपूर्वी कोलकाता उच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण आदेशानंतर गती आली. न्यायमूर्ती सौगात भट्टाचार्य यांनी 14 जुलै रोजी पोलिसांना निर्देश दिले होते की, अभिषेक पोरेल आणि या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला तात्काळ अटक करावी. याशिवाय, पीडितेचे खाजगी फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर किंवा इतरत्र प्रसारित होऊ नयेत, यासाठी संबंधित इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते.

पीडितेने पोलिसांनी आधी कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती, तसेच पोरेलने खाजगी फोटो सार्वजनिक करण्याची धमकी दिल्याचा दावाही केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित एक पेन ड्राईव्ह आधीच जप्त करण्यात आला असून तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, पीडिता 2023 मध्ये पहिल्यांदा पोरेलच्या संपर्कात आली होती आणि त्यानंतर त्यांच्यात जवळीक निर्माण होऊन दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची चर्चाही झाली होती. पीडितेने असाही गंभीर आरोप केला की, 2 एप्रिल रोजी दिल्लीत एका घटनेदरम्यान तिला डांबून ठेवण्यात आले, मारहाण झाली आणि जेवण न दिल्याने तिची तब्येत बिघडली, ज्यामुळे तिला वैद्यकीय उपचारांची गरज भासली होती.

तत्पूर्वी, 23 वर्षीय अभिषेक पोरेलने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. एवढचं नाहीतर पोलीस चौकशीनंतर सविस्तर उत्तर देणार असल्याचे सांगितले होते. पोरेलने 2021-22 च्या हंगामात बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि 2023 मध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघात सामील झाला होता. या अटकेमुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, न्यायालयीन प्रक्रियेनंतरच या प्रकरणाचा अंतिम निकाल स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT