

Delhi Capitals: डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. आयपीएल 2023 मध्ये 7 पैकी फक्त 2 सामने टीमने जिंकले आहेत.
त्याचबरोबर संघाला 5 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.
आता आयपीएल 2023 च्या मध्यातच, दिल्ली कॅपिटल्स संघासाठी आचारसंहिता (Code Of Conduct) लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीचे प्रमुख कारण समोर आले आहे.
फ्रँचायझी पार्टीदरम्यान एका खेळाडूने एका महिलेशी गैरवर्तन केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या खेळाडूंसाठी आचारसंहिता लागू केली आहे.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या विजयानंतर ही आचारसंहिता लागू करण्यात आली. ज्या खेळाडूने महिलेशी गैरवर्तन केले.
त्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही. दिल्ली कॅपिटल्सची सार्वजनिक प्रतिमा डागाळू नये. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन आचारसंहितेनुसार खेळाडूंना त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना रात्री 10 नंतर रुममध्ये आणण्याची परवानगी नाही. त्याला कोणाला भेटायचे असेल तर त्याला टीम हॉटेलमध्ये भेटावे लागेल.
मीटिंगला जाण्यापूर्वी खेळाडूंना दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) अधिकाऱ्यांना कळवावे लागेल. जर एखाद्या खेळाडूने आचारसंहितेचे पालन केले नाही तर त्या खेळाडूला दंड होऊ शकतो किंवा त्याचा करार संपुष्टात येऊ शकतो.
आयपीएल (IPL) 2023 हे दिल्ली कॅपिटल्ससाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. पहिल्या पाच सामन्यांमध्ये संघाला सलग पराभवाचा सामना करावा लागला. गुणतालिकेत संघ शेवटच्या स्थानावर आहे. खराब फलंदाजी ही संघासाठी मोठी समस्या आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.