VIDEO: मैदानावरचा 'किलर' ड्रेसिंग रुममध्ये रडला; मिलरच्या डोळ्यातील अश्रू पाहून सहकारीही हेलावले, कोचने दिला धीर

David Miller Crying Video Delhi Capitals: आयपीएल 2026 च्या थरारात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेला सामना क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरला.
David Miller Crying Video Delhi Capitals
David Miller Dainik Gomantak
Published on
Updated on

David Miller Crying Video Delhi Capitals: आयपीएल 2026 च्या थरारात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेला सामना क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरला. या सामन्यात दिल्लीचा विस्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर विजयाचा नायक ठरणार असे वाटत असतानाच, एका चुकीच्या निर्णयामुळे तो अचानक 'व्हिलन' ठरला. अवघ्या 1 रन्सने मिळालेल्या या पराभवानंतर मिलरला आपल्या चुकीचा इतका पश्चाताप झाला की, त्याला भर मैदानात अश्रू अनावर झाले.

या सामन्यात गुजरात टायटन्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 210 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने झुंजार खेळी केली. डेव्हिड मिलरने 41 धावांची नाबाद खेळी खेळत दिल्लीला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते. मात्र, शेवटच्या षटकात जे घडले त्याने दिल्लीच्या समर्थकांचा काळजाचा थरकाप उडाला. शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर मिलरने एक सोपी धाव (सिंगल) घेण्यास नकार दिला. मिलरला वाटले की तो शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारुन सामना जिंकून देईल, पण गुजरातच्या प्रसिद्ध कृष्णाने अचूक टप्प्यावर चेंडू टाकून मिलरच्या मनसुब्यांवर पाणी फेरले.

David Miller Crying Video Delhi Capitals
Delhi Capitals च्या खेळाडूने महिलेसोबत केले गैरवर्तन, फ्रँचायझीने घेतला 'हा' मोठा निर्णय

शेवटच्या चेंडूवर मिलरला मोठा फटका मारता आला नाही. धावसंख्या बरोबर करण्यासाठी त्याने कुलदीप यादवसह धाव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र जोस बटलरने चपळाई दाखवत कुलदीपला धावचीत केले आणि दिल्लीचा 1 रन्सने पराभव झाला. जर मिलरने पाचव्या चेंडूवर सिंगल घेतली असती, तर सामना किमान सुपर ओव्हरपर्यंत तरी गेला असता. सामना संपताच मिलरला आपली ही चूक उमजली आणि तो मैदानातच कोसळला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले, हे दृश्य पाहून उपस्थित प्रेक्षकही भावूक झाले.

David Miller Crying Video Delhi Capitals
Delhi Capitals vs Punjab Kings: पराभवाची 3 मोठी कारणे, या खेळाडूने केली सर्वाधिक निराशा

दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये मिलर पूर्णपणे खचलेला दिसत आहे. त्याला सावरण्यासाठी संघाचे प्रशिक्षक हेमंग बदानी आणि कर्णधार अक्षर पटेल पुढे आले. अक्षर पटेलने मिलरला मिठी मारुन धीर दिला, पण मिलरच्या चेहऱ्यावरचा पश्चाताप स्पष्टपणे जाणवत होता. एका चुकीच्या निर्णयामुळे विजयाचा घास तोंडातून गेल्याची सल मिलरला अस्वस्थ करत होती. दिल्लीने 209 धावांपर्यंत मजल मारली खरी, पण क्रिकेटमधील 'एका रन्सची किंमत' काय असते, याचा थरार या सामन्याने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com