Arun Jaitley Stadium Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023 पूर्वी दिल्लीतील स्टेडियमचे पालटणार रुप! खर्च करणार तब्बल 'एवढे' कोटी

Delhi Stadium: वर्ल्डकप 2023 पूर्व दिल्लीतील स्टेडियममध्ये सुधारणा करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहे.

Pranali Kodre

Delhi Arun Jaitley Stadium renovation before World Cup 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी (27 जून) भारतात होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वर्ल्डकपमधील 48 सामने 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतातील 10 शहरात खेळवले जाणार आहेत. यामध्ये दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमचाही समावेश आहे.

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर वर्ल्डकप 2023 मधील 5 सामने खेळवले जाणार आहेत. पण त्यापूर्वी या स्टेडियममध्ये अनेक सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यासाठी 20 ते 25 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.

याच स्टेडियमवर यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यावेळी प्रेक्षकांकडून स्टेडियममधील असुविधांबद्दल तक्रारी आल्या होत्या. तसेच स्टेडियममधील असुविधांबद्दल मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती.

त्यानंतर मीडियातील रिपोर्ट्सनुसार एप्रिलमध्ये असे सांगण्यात आले होते की हैदराबाद, कोलकाता, मुंबई, मोहाली आणि दिल्ली येथील स्टेडियममध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. दरम्यान, मोहालीमध्ये एकही वर्ल्डकप सामना ठेवण्यात आलेला नाही.

दरम्यान, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव रजत मनचंदा यांनी बीसीसीआयेच वर्ल्डकप सामन्यांचे आयोजन दिल्याबद्दल आभार मानले आहेत. तसेच त्यांनी सांगितले आहे की वर्ल्डकपदरम्यान प्रेक्षकांचा अनुभव चांगला राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.

याशिवाय त्यांनी सांगितले आहे की स्टेडियममधील जवळपास 10 हजार आसने बदलली जातील, तसेच नवीन वॉशरुम, चांगले जेवण आणि पाणी यांचीही सुविधा करण्यात येईल. तसेच हाऊसकिपिंग स्टाफही वाढवण्यात येईल.

दरम्यान, वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे सामने दिल्लीशिवाय हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलाकाता या 10 शहरांमध्ये होणार आहेत. तसेच गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि हैदराबाद येथे 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने होणार आहेत.

मुख्य स्पर्धेतील सामने ज्या 10 शहरात होणार आहेत, त्यातील केवळ हैदराबादला 3 सामने होणार आहेत. त्याव्यतिरिक्त अन्य सर्व 9 शहरात 5 सामने आयोजित करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT