Morocco vs Croatia Match Tied: Dainik Gomantak
क्रीडा

Morocco vs Croatia Match Tied: गतउपविजेत्या क्रोएशियाची गोलची पाटी कोरी; मोरक्कोविरूद्धचा सामना अनिर्णित

दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण; अनिर्णित राहिलेला या वर्ल्डकपमधील तिसरा सामना

Akshay Nirmale

Morocco vs Croatia Match Tied: फिफा वर्ल्डकप स्पर्धेत बुधवारी ग्रुप एफ मधील क्रोएशिया विरूद्ध मोरक्को सामना अनिर्णित ठरला. पुर्णवेळेत आणि भरपाई वेळेत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. विशेष म्हणजे क्रोएशिया हा गत फिफा वर्ल्डकपमधील उपविजेता संघ आहे.

(FIFA World Cup 2022)

क्रोएशियाने गोलसाठी बरेच प्रयत्न केला, पण त्यांची गोलची पाटी कोरीच राहिली. दुसरीकडे मोरक्कोचा गेम क्रोएशियाच्या तुलनेत कमी सरस होता. या वर्ल्डकपमधील हा तिसरा सामना आहे जो अनिर्णित राहिला आहे. यापुर्वी पोलंड विरूद्ध मेक्सिको आणि डेन्मार्क विरूद्ध ट्युनिशिया हे सामनेही अनिर्णित राहिले आहेत.

या सामन्यात चेंडुवर बहुतांशवेळी क्रोएशियानेच नियंत्रण राखले. भरपाई वेळेतही दोन्ही संघांनी गोलसाठी खूप प्रयत्न केले. दोन्ही संघांचे पासेस अचूक होते. पण पासेसचे रूपांतर गोलमध्ये करण्यात त्यांना यश आले नाही. मोरक्कोच्या एका खेळाडुला धसमुसळ्या खेळाबद्दल यलो कार्ड दाखविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT