TRAU dainik gomantak
क्रीडा

गतउपविजेत्या चर्चिल ब्रदर्सची पीछेहाट कायम

आणखी एका पराभवामुळे आय-लीगमध्ये चर्चिल ब्रदर्स अकराव्या क्रमांकावर

दैनिक गोमन्तक

पणजी : गतउपविजेत्या चर्चिल ब्रदर्सची आय-लीग फुटबॉल (Football) स्पर्धेतील पीछेहाट कायम आहे. शनिवारी त्यांना मणिपूरच्या टिड्डिम रोड ॲथलेटिक युनियन (ट्राऊ) (Tiddim Road Athletic Union) संघाने 2-0 फरकाने हरविले, त्यामुळे माजी विजेता संघ अकराव्या क्रमांकावर घसरला. (Defeat of runners-up Churchill Brothers)

पश्चिम बंगालमधील (West Bengal) नैहाटी येथे झालेल्या लढतीत ट्राऊ संघाने स्पर्धेतील पहिला विजय नोंदविला. किशन सिंग याने 34व्या, तर ब्राझीलियन (Brazil) डग्लस व्हेलोसो सांताना याने 52व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे मणिपूरच्या (Manipur) संघाने सलग दोन पराभवानंतर विजयी जल्लोष केला. त्यांचे आता चार लढतीनंतर चार गुण झाले असून ते दहाव्या क्रमांकावर आहेत. चर्चिल ब्रदर्सचा हा लागोपाठ दुसरा, तर एकंदरीत तिसरा पराभव ठरला. त्यामुळे चार सामन्यानंतर त्यांचा एक गुण कायम राहिला.

चर्चिल ब्रदर्सची (Churchill Brothers) सुरवात आक्रमक होती, पण त्यांना संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. नायजेरियन (Nigerian) केनेथ न्ग्वोके याचा हेडर भेदक ठरू सखला नाही. मात्र अर्ध्या तासाच्या खेळानंतर ट्राऊ संघाने संधी साधली. किशनचा डाव्या पायाचा फटका प्रतिस्पर्धी खेळाडूस चाटून नेटमध्ये गेला. त्यानंतर कोमरॉन तुर्सूनोव याचा सणसणीत फटका ट्राऊ संघाच्या अमृत गोपे याने चपळाईने फोल ठरल्यामुळे चर्चिल ब्रदर्सला बरोबरी साधता आली नाही. विश्रांतीनंतरच्या सातव्या मिनिटास ट्राऊ संघाने भक्कम स्थिती गाठताना आणखी एक गोल केला. ब्राझीलियन (Brazil) डग्लसचा हेडर भेदक ठरल्यामुळे चर्चिल ब्रदर्सचे नुकसान झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT