दीपक हुडा याने भ्रष्टाचारविरोधी मार्गदर्शक तत्त्वांचे (Anti-Corruption Guidelines) उल्लंघन केले आहे की नाही हे तपासाद्वारे पाहण्यात येणार आहे. Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2021: दीपक हुड्डाने केले भ्रष्टाचारविरोधी तत्त्वांचे उल्लंघन? BCCI करणार तापसणी

संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) गेल्या वर्षीच्या आयपीएलच्या आधी, एसीयूचे (ACU) माजी प्रमुख अजित सिंह म्हणाले होते की, त्यांची टीम सोशल मीडियावरील संवादांवर बारीक लक्ष ठेऊन आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) हे भ्रष्टाचाराविरोधात झीरो टॉलरेंसचे (Zero Tolerance) धोरण आवलंबत आहे. शब्बीर हुसेन शेखदम खंडवाला (Shabbir Hussain Sheikhdam Khandwala) यांच्या नेतृत्वाखालील लाचलुचपत प्रतिबंधक युनिट सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएलवर (IPL) बारीक लक्ष ठेवून आहे. मंगळवारी (21 सप्टेंबर) दुबईमध्ये पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना झाला. या सामन्यापूर्वी पंजाबचा फलंदाज दीपक हुड्डा (Deepak Hooda) याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक युनिट करणार आहे. दीपक हुडा याने भ्रष्टाचारविरोधी मार्गदर्शक तत्त्वांचे (Anti-Corruption Guidelines) उल्लंघन केले आहे की नाही हे तपासाद्वारे पाहण्यात येणार आहे.

ACU तपास करेल

याबाबत वृत्तसंस्थेशी बोलताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एक अधिकारी म्हणाले की, "त्याने टाकलेली इंन्स्टाग्राम पोस्ट ही BCCI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहे की नाही हे तपासेल जाईल.

सामन्यापूर्वी हुड्डाने शेअर केली पोस्ट

पंजाब किंग्जचा फलंदाज दीपक हुड्डा याने मंगळवारी दुपारी 2 वाजता इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये तो संघाचे हेल्मेट हातात घेताना दिसत आहे. त्याने लिहिले, पंजाब किंग्ज सामन्यासाठी तयार आहे.

मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक

जेव्हा ACU च्या अधिकाऱ्याला विचारण्यात आले की, क्रिकेटपटूंनी त्यांच्या अनुयायांच्या आणि सोशल मीडियावरील चाहत्यांच्या संदेशांवर कशी प्रतिक्रिया दिली पाहिजे यावर काही चर्चा झाली आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना, एसीयू अधिकारी म्हणाले, काय करावे आणि काय करू नये याबाबत एक मार्गदर्शक तत्त्वे आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) गेल्या वर्षीच्या आयपीएलच्या आधी, एसीयूचे माजी प्रमुख अजित सिंह म्हणाले होते की, त्यांची टीम सोशल मीडियावरील संवादांवर बारीक लक्ष ठेऊन आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT