IPL 2021: हिटमॅन रोहित आणि हार्दिक आजच्या सामन्यासाठी 'फिट' की 'अनफिट' ?

संघाचा कर्णधार रोहित शर्माआणि धडाकेबाज अष्टपैलू हार्दिक पंड्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यात (IPL 2021) खेळू शकला नाही.
IPL 2021: Rohit Sharma and Hardik Pandya will play or not todays match
IPL 2021: Rohit Sharma and Hardik Pandya will play or not todays match Dainik Gomantak

यूएईमध्ये (UAE) खेळल्या जाणाऱ्या आयपीएल 2021 (IPL 2021) हंगामाच्या दुसऱ्या भागाची सुरुवात गतविजेत्या मुंबई इंडियन्ससाठी (MI) चांगली झाली नाही. पहिल्याच सामन्यात संघाला त्याचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या हातून पराभवाला सामोरे जावे लागले. या हंगामात 8 सामन्यांमध्ये संघाचा हा चौथा पराभव होता. नुकसान बाजूला ठेवून, त्याच्या दोन प्रमुख खेळाडूंची तंदुरुस्ती संघासाठी चिंतेचे कारण आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि धडाकेबाज अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) चेन्नईविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही.जरी दोघांच्या फिटनेसचा प्रश्न गंभीर नसल्याचे सांगितले जात होते, परंतु गुरुवार 23 सप्टेंबर रोजी कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) विरूद्धच्या सामन्याततरी हे दोन्ही दिग्गज खेळाडू खेळतील का याबाबतही आणखीन स्पष्टता नाही. (IPL 2021: Rohit Sharma and Hardik Pandya will play or not todays match)

गुरुवारी अबुधाबीमध्ये केकेआरविरुद्धच्या सामन्याआधी, संघाचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने ऑनलाईन मीडिया कॉन्फरन्समध्ये रोहित आणि हार्दिकच्या फिटनेसविषयी अपडेट दिली आहे. बोल्ट म्हणाला की, दोन्ही खेळाडूंना खबरदारी म्हणून पहिल्या सामन्यात मैदानात उतरवले गेले नाही. दोघेही बरे होत आहेत. पुढील सामन्यासाठी निवडीचा प्रश्न मात्र तसाच आहे खबरदारी म्हणून चेन्नईविरुद्ध दोघांनाही विश्रांती देण्यात आली होती.

IPL 2021: Rohit Sharma and Hardik Pandya will play or not todays match
IPL 2021 मध्ये सनरायजर हैद्राबादची 7 वी हार

दुबईती झालेल्या चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या सामन्यात चांगली सुरुवात असूनही मुंबईने संधी गमावली आणि चेन्नईने गेम उलटवूत सामना जिंकला होता. बोल्टने कबूल केले की कर्णधार रोहित त्या सामन्यात नसल्याने नुकसान झाले आहे . फॉरमॅटमधील धावा आणि अनुभवाच्या बाबतीत तो अव्वल खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे हा एक मोठा दोष होता. पण तो एक चांगला निर्णय होता जेणेकरून तो 100 टक्के तंदुरुस्त होऊ शकेल, कारण पुढे बरेच क्रिकेट आहे. असे ट्रेंट बोल्टनेसांगितले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत रोहित शर्माला त्याच्या दुसऱ्या डावातील शतकादरम्यान दुखापत झाली होती, त्यानंतर तो त्यातून सावरत होता. चेन्नईविरुद्ध कर्णधारपद भूषवणाऱ्या किरन पोलार्डने असेही सांगितले की यापेक्षा गंभीर काहीही नाही आणि तो लवकरच पुन्हा दिसणार आहे. तथापि, हार्दिकच्या फिटनेसबाबत अद्याप कोणतेही विधान किंवा माहिती देण्यात आलेली नाही,

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com