Mukesh Kumar & Tilak Verma Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND 1st T20: टीम इंडियासाठी आजचा खास दिवस! 'या' 2 युवा खेळाडूंचे पदार्पण

Manish Jadhav

WI vs IND, 1st T20I Playing 11: कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला T20 सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे.

या सामन्यात विंडीज संघाचा कर्णधार रोव्हमन पॉवेल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भारताच्या 2 खेळाडूंचे नशीब उघडले.

हार्दिक नाणेफेक हरला

त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर वेस्ट इंडिजचा (West Indies) कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे आहे. हार्दिकने प्लेइंग-11 ची घोषणा करताच या दोन्ही खेळाडू आणि त्यांच्या चाहत्यांच्या आनंदात भर पडली.

या 2 खेळाडूंचे टी-20 पदार्पण

हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) या सामन्यासाठी प्लेईंग-11 मध्ये 2 युवा खेळाडूंना संधी दिली, ज्यांनी यासह त्यांचे T20 आंतरराष्ट्रीय पदार्पण देखील केले. पहिले नाव या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या तिलक वर्माचे आहे.

20 वर्षीय तिलकने IPL-2023 मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आणि रोहितच्या नेतृत्वाखाली शानदार प्रदर्शन केले.

दुसरे नाव वेगवान गोलंदाज मुकेश कुमारचे आहे. या मालिकेतून मुकेशने तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. मुकेशने आधी कसोटी, नंतर एकदिवसीय आणि आता टी-20 मध्ये पदार्पण केले.

काय म्हणाला कॅप्टन पांड्या?

नाणेफेक हारल्यानंतर हार्दिक म्हणाला की, 'या दौऱ्याची ही संपूर्ण योजना होती. आम्ही बहुधा येथे विश्वचषक (पुढच्या वर्षी) खेळण्यासाठी येत आहोत. काही खेळाडूंना येथे खेळण्याची संधी मिळू शकते. पुढच्या वेळी इथे येईपर्यंत आम्ही तयार होऊ. मी गोष्टी साध्या ठेवण्याचा प्रयत्न करतो.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT