क्रीडा

Cricket Retirement: क्रिकेटसाठी भावनिक आठवडा, दोन दिग्गज करणार अलविदा! भारत अन् पाकिस्तानविरुद्ध खेळणार अखेरचे

Pranali Kodre

Dean Elgar and David Warner last Test Match:

क्रिकेटसाठी चालू आठवडा भावनिक ठरणार आहे. याच आठवड्यात दोन दिग्गज सलामीवीर कसोटी क्रिकेटचा निरोप घेणार आहेत. 3 ते 7 जानेवारीदरम्यान दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात केपटाऊनला दुसरा कसोटी सामना रंगणार आहे, तर सिडनीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे.

हे दोन्ही सामन्यांना भावनिक किनार लाभली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गार आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर हे आपापल्या संघांकडून अनुक्रमे केपटाऊन आणि सिडनी कसोटीनंतर निवृत्ती घेणार आहेत. त्यामुळे 3 ते 7 जानेवारी दरम्यान होणारे सामने या दोघांसाठीही अखेरचे सामने आहेत.

डीन एल्गार भारताविरुद्ध अखेरचे करणार नेतृत्व

दिग्गज सलामीवीर एल्गार भारताविरुद्ध केपटाऊनला होणाऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करणार आहे. हा त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असेल.

दक्षिण आफ्रिकेचा नियमित कर्णधार तेंबा बाऊमा दुखापतग्रस्त असल्याने या सामन्यात खेळणार नाही. त्याचमुळे एल्गारचा सन्मान म्हणून त्याला या सामन्यात नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. एल्गारने यापूर्वीही दक्षिण आफ्रिकेचे कसोटीत नेतृत्व केले आहे.

एल्गार 26 ते 30 डिसेंबर 2023 दरम्यान भारताविरुद्ध सेंच्युरियनला झालेल्या कसोटीतील सामनावीर आहे. त्याने 185 धावांची खेळी करत दक्षिण आफ्रिकेला डावाने विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा उचलला होता.

एल्गार गेल्या 12 वर्षांपासून दक्षिण आफ्रिका कसोटी संघाचा प्रमुख खेळाडू राहिला आहे. त्याने कसोटीत त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

36 वर्षीय एल्गारने आत्तापर्यंत 85 कसोटी सामन्यात 38.35 च्या सरासरीने 5331 धावा केल्या आहेत. यामध्ये 14 शतके आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 8 वनडे सामनेही खेळले आहेत. यामध्ये त्याने 104 धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत 14 विकेट्सही घेतल्या आहेत.

एल्गारने 17 कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करताना 9 सामने जिंकले आणि 7 सामने पराभूत झाले, त्याचबरोबर 1 सामना अनिर्णित राहिला आहे.

डेव्हिड वॉर्नरचाही अलविदा

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज डेव्हिड वॉर्नरनेही काही दिवसांपूर्वीच घोषीत केले होते की तो पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत अखेरचे खेळणार आहे. या मालिकेतनंतर तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.

त्याने नंतर असेही जाहीर केले की तो वनडेतूनही निवृत्त होत आहे. त्यामुळे तो आता ऑस्ट्रेलियाकडून केवळ टी20 क्रिकेट खेळताना दिसू शकतो.

दरम्यान, तो आता पाकिस्तानविरुद्ध सिडनीत अखेरचा कसोटी सामना खेळताना दिसणार आहे. त्याची ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली आहे. वॉर्नरही गेल्या 12 वर्षांपासून ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे.

तो ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये आणि शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये पाँटिंगनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. वॉर्नरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 49 शतके करताना 18521 धावा केल्या आहेत.

डिसेंबर 2011 मध्ये वॉर्नरने कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याने आत्तापर्यंत 111 कसोटी सामने खेळले असून 44.58 च्या सरासरीने 8695 धावा केल्या आहेत, ज्यात 26 शतके केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT