AUS vs PAK: पाकिस्तानला धोबीपछाड! ऑस्ट्रेलियाकडे विजयी आघाडी; बॉक्सिंग डे कसोटीत कमिन्सच्या 10 विकेट्स

Boxing Day Test: ऑस्ट्रेलियाने बॉक्सिंग डे कसोटीत पाकिस्तानला पराभवाचा धक्का देत मालिकाही खिशात टाकली आहे.
Australia Cricket Team
Australia Cricket TeamAFP
Published on
Updated on

Australia won Boxing Day Test at Melbourne against Pakistan by 79 Runs:

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने शुक्रवारी (29 डिसेंबर) पाकिस्तानला दुसऱ्या कसोटी सामन्यात 79 धावांनी पराभूत केले. मेलबर्नला झालेला हा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना होता.

या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात कर्णधार पॅट कमिन्सने 10 विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यात चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात 84.1 षटकात 262 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे पहिल्या डावातील 54 धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर 317 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला दुसऱ्या डावात 67.2 षटकात सर्वबाद 237 धावाच करता आल्या.

या डावात पाकिस्तानचे सलामीवीर झटपट बाद झाले होते. पाकिस्तानकडून कर्णधार शान मसूदने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. त्याचबरोबर बाबर आझमने 41 धावांची खेळी केली.

Australia Cricket Team
AUS vs PAK, Video: कमिन्स-कॅरे पळाले चक्क 5 धावा, पाकिस्तानचा फिल्डिंगमध्ये सावळा गोंधळ

मसूद आणि बाबर यांच्यात 61 धावांची तिसऱ्या विकेटसाठी भागीदारीही झाली होती. हे दोघे बाद झाल्यानंतर सौद शकिल 24 धावा करून बाद झाला, तर नंतर मोहम्मद रिझवान आणि आघा सलमान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यात 6 व्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारीही झाली.

मात्र, नंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कमिन्सने संघाला पुनरागमन करून दिले. त्याने रिझवानला 35 धावांवर बाद केले. त्यानंतर मात्र, एका बाजूने अघा सलमानने अर्धशतकी खेळी केली असताना अन्य फलंदाज त्याला साथ देऊ शकले नाही. अघा सलमानही 9 व्या विकेटच्या रुपात बाद झाला. त्याने 50 धावा केल्या.

या डावात ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल स्टार्कने 4 विकेट्स घेतल्या, तर जोश हेजलवूडने 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात मिचेल मार्शने सर्वाधिक 96 धावांची खेळी केली. तसेच यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरेने 53 धावांची खेळी केली, तर स्टीव्ह स्मिथने 50 धावा केल्या.

दुसऱ्या डावा पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना शाहिन आफ्रिदी आणि मिर हामझा यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. तसेच अमीर जामलने 2 विकेट्स घेतल्या.

Australia Cricket Team
AUS vs PAK: ऐकावं ते नवलंच! अंपायरच अडकले लिफ्टमध्ये, सामनाही थांबला; वाचा नक्की झालं काय

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला आघाडी

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 96.5 षटकात 318 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून लॅब्युशेनने सर्वाधिक 63 धावांती खेळी केली. तसेच मिचेल मार्शने 41 धावा केल्या, तर उस्मान ख्वाजाने 42 धावांची खेळी केली. याबरोबरच डेव्हिड वॉर्नरने 38 धावांची, स्टीव्ह स्मिथने 26 धावांची छोटेखानी खेळी केली.

पाकिस्तानकडून या डावात अमीर जामेलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर शाहिन आफ्रिदी, मीर हामझा आणि हसन अली यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर अघा सलमानने 1 विकेट घेतली.

त्यानंतर दुसऱ्या दिवसाखेर पाकिस्तानने पहिल्या डावात 73.5 षटकात सर्वबाद 264 धावा केल्या. त्यामुळे त्यांना 54 धावांची पिछाडी स्विकारावी लागली होती.

पहिल्या डावात पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफिकने सर्वाधिक 62 धावांची खेळी केली, तर कर्णधार शान मसूदने 54 धावा केल्या. याशिवाय मोहम्मद रिझवानने 42 धावांची, तर अमीर जामेलने 33 धावांची खेळी केली. त्याचबरोबर शाहिन आफ्रिदीने 21 धावांचे योगादान दिले.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या, तर नॅथन लायनने 4 विकेट्स घेतल्या आणि जोश हेजलवूडने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com