Mumbai Indians  Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023, DC vs MI: तीन विकेट्स घेत सायका इशाक ठरली 'प्लेअर ऑफ द मॅच'

DC vs MI: मुंबई इंडियन्सने गुरुवारी येथे दिल्ली कॅपिटल्सचा आठ गडी राखून पराभव करुन महिला प्रीमियर लीग (WPL) T20 क्रिकेट स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला.

Manish Jadhav

DC vs MI: मुंबई इंडियन्सने गुरुवारी येथे दिल्ली कॅपिटल्सचा आठ गडी राखून पराभव करुन महिला प्रीमियर लीग (WPL) T20 क्रिकेट स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला.

प्रथम फलंदाजी करताना दिल्लीचा संघ 18 षटकांत 105 धावांवर गारद झाला. मुंबईने 15 षटकांत 2 बाद 109 धावा करुन लक्ष्य सहज गाठले.

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करताना गुरुवारी येथे महिला प्रीमियर लीग (WPL 2023) T20 क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला 18 षटकांत 105 धावांत गारद केले.

दरम्यान, मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वर्चस्व राखले. त्यांच्याकडून डावखुरी फिरकीपटू सायका इशाक (13 धावांत 3 बळी), तर इस्सी वोंग (10 धावांत 3 बळी) आणि ऑफस्पिनर हेली मॅथ्यूज (19 धावांत 3 बळी) यांनी तीन बळी घेतले.

दुसरीकडे, नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या दिल्ली संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने पॉवरप्लेच्या सहा षटकांत केवळ 29 धावा केल्या आणि त्यादरम्यान शफाली वर्मा (Shafali Verma) (2) आणि एलिस कॅप्सी (6) यांच्या विकेट्स गमावल्या. मारिजन कॅप (2) ही येताच पॅव्हेलियनमध्ये परतली, त्यामुळे धावसंख्या तीन गडी बाद 31 अशी झाली.

तसेच, जेमिमाह रॉड्रिग्जने नेट स्कायव्हर ब्रंटच्या चेंडूवर तीन चौकार मारुन धावसंख्येला काहीशी गती दिली, तर लॅनिंगने अमेलिया केरला सलग तीन चौकार मारले. यानंतर दिल्लीने (Delhi) नऊ चेंडू आणि तीन धावांत चार विकेट गमावल्या. मात्र, शेवटी सायका इशाकने या दोघींमधील 50 धावांची भागीदारी संपुष्टात आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: पाहावं ते नवलंच!! 21 लाखांचा गंडा घातलेल्या माणिकरावचं हार घालून स्वागत; मित्र म्हणतोय "वेलकम टू गोवा सिंघम"

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

Goa Today's News Live: मालपे पेडणे येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलिस घटनास्थळी दाखल

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT