David Waner Instagram Story X/IPL and Instagram
क्रीडा

David Warner: सनरायझर्स हैदराबादने चक्क वॉर्नरला केलं ब्लॉक! खुद्द IPL विजेत्या कर्णधाराचाच मोठा खुलासा

Sunrisers Hyderabad: डेव्हिड वॉर्नरने त्याला सनरायझर्स हैदराबादने सोशल मीडियावर ब्लॉक केले असल्याचा खुलासा केला आहे.

Pranali Kodre

David Warner revealed Sunrisers Hyderabad blocked him on Twitter and Instagram:

दुबईमध्ये मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा लिलाव सुरु आहे. या लिलावात अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मोठ्या रकमेची बोली लागली आहे. पण याचदरम्यान ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने सांगितले आहे की त्याला सनरायझर्स हैदराबादने सोशल मीडियावर ब्लॉक केले आहे.

झाले असे की आयपीएल 2024 लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ट्रेविस हेडसाठी 6.8 कोटी रुपयांची बोली सनरायझर्स हैदराबादने लावली आणि त्याला आपल्या संघात सामील केले. याबद्दल इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करण्याचा वॉर्नरने प्रयत्न केला, मात्र त्याच्या लक्षात आले की त्याला सनरायझर्स हैदराबादने ब्लॉक केले आहे.

त्यानंतर त्याने त्याला सनरायझर्स हैदराबादने इंस्टाग्राम आणि एक्स (ट्वीटर) ब्लॉक केले असल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यावर त्याने ट्रेविस हेडला टॅगही केले आहे आणि हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.

तसेच त्याने नंतर पॅट कमिन्सलाही टॅग करत पोस्ट केली आहे. कमिन्सला तब्बल 20.50 कोटी रुपयांना हैदराबादने आयपीएल लिलावात खरेदी केले आहे.

David Warner Instagram Story

वॉर्नर खेळलाय हैदराबादकडून

दरम्यान, वॉर्नर आयपीएलमध्ये अनेकवर्षे सनरायझर्स हैदराबादकडून खेळत होता. तो 2014 ते 2021 दरम्यान या संघाकडून आयपीएल खेळला. विशेष म्हणजे त्याच्याच नेतृत्वाखाली हैदराबादने 2016 साली आयपीएलचे विजेतेपदही जिंकले होते.

मात्र, 2021 आयपीएलदरम्यान वॉर्नर आणि सनरायझर्स हैदराबादमधील मॅनेजमेंटमध्ये वाद झाल्याची बरीच चर्चा झाली होती.

याच हंगामादरम्यान त्याला कर्णधारपदावरून काढत हैदराबादने केन विलियम्सनकडे नेतृत्वाची धूरा सोपवली होती. या हंगामानंतर हैदराबादने वॉर्नरला करारमुक्त केले. यानंतर 2022 आयपीएलच्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने वॉर्नरला संघात घेतले.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की वॉर्नर हैदराबादकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 95 टी20 सामन्यांत हैदराबादकडून 49.55 च्या सरासरीने 4014 धावा केल्या. यामध्ये 2 शतकांचा आणि 40 अर्धशतकांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT