David Warner: तोल गेला, पण वॉर्नरने असा सिक्स मारला की शाहिन आफ्रीदीही बघतच राहिला, पाहा व्हिडिओ

Australia vs Pakistan: पाकिस्तानविरुद्ध पर्थमध्ये सुरु असलेल्या कसोटीत डेव्हिड वॉर्नरने एक भन्नाट षटकार मारला, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
David Warner
David WarnerX/cricketcomau
Published on
Updated on

David Warner Superb six against Shaheen Afridi during Australia vs Pakistan 1st Test at Perth:

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थला खेळवला जात आहे. या सामन्यातील पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने शतकी खेळी केली. या खेळीदरम्यान, त्याने एक शानदार षटकार मारला, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरले होते. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी शतकी भागीदारी करत शानदार सुरुवात केली.

David Warner
IND vs AUS: 'अंपायरने त्यांचं काम केलं...', शेवटच्या ओव्हरमधील नाट्यमय घटनांनंतर हेडनचा पक्षपाताचा आरोप

वॉर्नरने सुरुवातीलाच आक्रमक खेळण्यास सुरुवात केली होती. त्याने 41 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने अमीर जामेलविरुद्ध अप्पर कट मारत चौकार ठोकला आणि त्याचे शतक 125 चेंडूत पूर्ण केले.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील २२ व्या षटकात शाहिन आफ्रिदी गोलंदाजीला आला होता. त्यावेळी त्याने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर वॉर्नरने टी20 स्टाईल फलंदाजीचा नमुना दिला.

तो चेंडू खेळण्यासाठी वॉर्नरने खाली वाकून त्याच्या शरिराचा वापर करत मागे फटका मारला. त्यावेळी वॉर्नर खाली पडलाही, पण त्याचा शॉट इतका शानदार होता की तो चेंडू थेट षटकारासाठी गेला. त्याच्या या षटकाराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

David Warner
David Warner: 'टीकाकारांचं तोंड बंद करण्यासाठी...', शतक ठोकताच वॉर्नरचं अनोखं सेलिब्रेशन, पाहा Video

या सामन्यात वॉर्नर आणि ख्वाजा यांच्यात सलामीला 126 धावांची भागीदारी झाली. ख्वाजा 41 धावांवर बाद झाला, तर ट्रेविस हेडने 40 धावांची खेळी केली. त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथने 31 धावा केल्या.

या दरम्यान वॉर्नरने शानदार दीडशतक केले. तो 211 चेंडूत 164 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याला अमीर जामेलने बाद केले. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाखेर 84 षटकात 5 बाद 346 धावा केल्या.

पाकिस्तानकडून अमीर जामेलने 2 विकेट्स घेतल्या. शाहिन आफ्रिदी, खुर्रम शेहजाद आणि फहिम अश्रफ यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com