David Warner Dainik Gomantak
क्रीडा

David Warner Post: 'त्यांना सार्वजनिक तमाशा मांडायचाय', वॉर्नरने सुनावले खडे बोल

डेव्हिड वॉर्नरने संतापून त्याच्यावर असलेल्या नेतृत्वाच्या बंदी विरुद्ध केलेलं अपील मागे घेतले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

David Warner Post: मार्च 2018 मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेली केपटाऊन कसोटी चेंडू छेडछाडी प्रकरणावरून गाजली होती. या प्रकरणात त्यावेळचे ऑस्ट्रेलियाचे कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर देखील अडकले होते. पण आता या प्रकरणाला जवळपास 5 वर्षे उलटून गेले आहे. मात्र या प्रकरणाचे परिणाम वॉर्नर अजूनही भोगत आहे.

त्याचमुळे वॉर्नरने बुधवारी सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने रिव्ह्यू पॅनेललाही खडे बोल सुनावले आहेत. या प्रकरणामुळे वॉर्नर आणि स्मिथ यांच्यावर क्रिकेट खेळण्यासाठी एक वर्षांची बंदी घालण्यात आली होती, जी आता संपली आहे. तसेच नेतृत्व करण्यासाठी स्मिथवर 2 वर्षांसाठी, तर वॉर्नरवर आजीवन बंदी घालण्यात आलेली.

दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गेल्या महिन्यात त्यांच्या आचार संहितेतील नियम बदलल्यानंतर वॉर्नरने त्याच्या नेतृत्वाच्या भूमिकेसाठी असलेली आजीवन बंदी उठवण्यात यावी यासाठी अपील केले होते. मात्र आता त्याने हे अपील मागे घेतले असून त्याने या प्रक्रियेवर टीका केली आहे.

वॉर्नरने त्याच्या पोस्टमध्ये आरोप केला आहे की क्रिकेट ऑस्ट्रेलियापासून स्वतंत्र असलेल्या रिव्ह्यू पॅनेलच्या काउंसिल असिस्टींगकडून प्रक्रियेदरम्यान काही अक्षेपार्ह कमेंट्स करण्यात आल्या. तो म्हणाला की कठीण काळातही त्याचे कुटुंब त्याच्या बरोबर होते आणि त्याच्यासाठी त्याचे कुटुंब जास्त महत्त्वाचे आहे.

वॉर्नरने पोस्टमध्ये म्हटलयं की काउंसिल असिस्टींग आणि काही प्रमाणात रिव्ह्यू पॅनल केपटाऊन कसोटीत जे झाले त्याची सार्वजनिक चौकशी करू इच्छितात. त्याने 'सार्वजनिक तमाशा' मांडायचा आहे, असेही म्हटले आहे. त्याचबरोबर तो असेही म्हणाला, 'क्रिकेटच्या घाणेरड्या लाँड्रीसाठी माझे कुटुंब वॉशिंग मशिन बनवण्यास मी तयार नाही.'

वॉर्नर पोस्टमध्ये असेही म्हटले की रिव्ह्यू पॅनलची इच्छा अशी दिसते की त्यांना त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा आणखी अपमान आणि त्रास द्यायचा आहे. त्याने अखेरीस लिहिले आहे की 'मला खेद वाटतो की माझ्याकडे अपील मागे घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मी माझ्या कुटुंबाला आणि संघसहकाऱ्यांना आणखी त्रास होऊ देऊ इच्छित नाही.'

वॉर्नरने त्याच्या पोस्टच्या सर्वात शेवटी लिहिले आहे की 'काही गोष्टी क्रिकेटपेक्षाही महत्त्वाच्या असतात.'

वॉर्नरच्या या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया आल्या आहेत. आता हे प्रकरण काय वळण घेणार हे पाहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT