David Warner 
क्रीडा

World Cup 2023: वॉर्नरची शतक ठोकत सचिनशी बरोबरी, रोहितच्याही विश्वविक्रमाच्या पोहचला जवळ

David Warner Century: वर्ल्डकप 2023 मध्ये डेव्हिड वॉर्नरने नेदरलँड्सविरुद्ध शतक ठोकत सचिन तेंडुलकरच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

Pranali Kodre

David Warner equalled Sachin Tendulkar's record during Australia vs Netherlands Match in ICC ODI Cricket World Cup 2023:

बुधवारी (25 ऑक्टोबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स संघात सामना झाला. दिल्लीतीन अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 309 धावांनी विजय मिळवला. या विजया डेव्हिड वॉर्नरने शतक करत त्याचे महत्त्वाचे योगदान दिले. याबरोबरच त्याने मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली आहे.

वॉर्नरने या सामन्यात 93 सामन्यात 104 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 3 षटकार मारले. हे वॉर्नरचे वनडे वर्ल्डकपमधील एकूण सहावे शतक आहे. त्याने वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत रिकी पाँटिंग आणि कुमार संगकाराला मागे टाकले असून सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे.

पाँटिंग आणि संगकारा यांनी वनडे वर्ल्डकपमध्ये प्रत्येकी पाच शतके केली आहेत. तसेच सचिननेही सहा शतके केली आहेत. तसेच या यादीत अव्वल क्रमांकावर ७ शतकांसह रोहित शर्मा आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की रोहित आणि वॉर्नर यांच्यात आता केवळ एका शतकाचे अंतर आहे. त्यामुळे त्यांच्यातही यंदा या यादीत अव्वल क्रमांकावर राहण्यासाठी चढाओढ असेल.

  • वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू -

    • 7 शतके - रोहित शर्मा

    • 6 शतके - सचिन तेंडुलकर

    • 6 शतके - डेव्हिड वॉर्नर

    • 5 शतके - रिकी पाँटिंग

    • 5 शतके - कुमार संगकारा

डिविलियर्स-रोहितला वॉर्नरने टाकले मागे

दरम्यान, वॉर्नरचे हे वनडे कारकिर्दीतील 22 वे शतक होते. त्याने 153 व्या डावात खेळताना हे शतक केले, त्यामुळे तो सर्वात जलद 22 वनडे शतके करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत एबी डिविलियर्स आणि रोहित शर्माला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. डिविलियर्सने 186 डावात आणि रोहित शर्माने 188 डावात 22 शतके केली होती.

तसेच या यादीत अव्वल क्रमांकावर हाशिम आमला आहे, त्याने 126 डावात 22 वनडे शतके केली होती, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीने 143 डावात 22 वनडे शतके केली होती.

  • सर्वात जलद 22 वनडे शतके करणारे क्रिकेटपटू

    • 126 डाव - हाशिम आमला

    • 143 डाव - विराट कोहली

    • 153 डाव - डेव्हिड वॉर्नर

    • 186 डाव - एबी डिविलियर्स

    • 188 डाव - रोहित शर्मा

ऑस्ट्रेलियाचा विजय

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 399 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नर व्यतिरिक्त ग्लेन मॅक्सवेलने 44 चेंडूत 106 धावांची खेळी केली.

त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथने 71 धावांची आणि मार्नस लॅब्युशेनने 62 धावांची अर्धशतकी खेळी केली. नेदरलँड्सकडून लोगन वॅन बिकने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 400 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सला 21 षटकात सर्वबाद 90 धावाच करता आल्या. नेदरलँड्सकडून विक्रमजीत सिंगने सर्वाधिक 25 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त नेदरलँड्सकडून कोणालाही 15 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही.

ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना ऍडम झम्पाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तसेच मिचेल मार्शने 2 विकेट्स घेतल्या, तर मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT