India vs Australia | David Warner 
क्रीडा

IND vs AUS: अर्धशतक हुकलं, पण वॉर्नरने सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रम तोडत रचला नवा इतिहास

David Warner: वर्ल्डकपमधील भारताविरुद्धच्या सामन्यात खेळताना वॉर्नरने नवा विश्वविक्रम केला आहे.

Pranali Kodre

David Warner Break Sachin Tendulkar record during India vs Australia match of ICC ODI Cricket World Cup 2023:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात वर्ल्डकप २०२३ मधील सामना रविवारी चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने मोठा विश्वविक्रम नावावर केला आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांनी पहिली विकेट तिसऱ्यात षटकात गमावली. मात्र, नंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.

मात्र, त्यांची भागीदारी रंगत असतानाच वॉर्नरला कुलदीप यादवने १७ व्या षटकात बाद केले. वॉर्नरने ५२ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. त्याचे अर्धशतक ९ धावांनी हुकले. पण या खेळीदरम्यान त्याने वनडे वर्ल्डकपमध्ये १००० धावा पूर्ण केल्या.

वॉर्नरने वर्ल्डकपमधील १९ व्या डावात खेळताना १००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे तो वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात जलद १००० धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकर आणि एबी डिविलियर्सचा विक्रम मोडला आहे.

सचिन आणि डिविलियर्सने वर्ल्डकपमध्ये प्रत्येकी २० डावात १००० धावा पूर्ण केल्या होत्या. त्यापाठोपाठ विव रिचर्ड्स आणि सौरव गांगुली आहे. रिचर्ड्स आणि गांगुली यांनी वर्ल्डकपमध्ये प्रत्येकी २१ डावात १००० धावा केल्या आहेत.

वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारे क्रिकेटर

  • १९ डाव - डेविड वॉर्नर

  • २० डाव - सचिन तेंडुलकर

  • २० डाव - एबी डिविलियर्स

  • २१ डाव - विव रिचर्ड्स

  • २१ डाव - सौरव गांगुली

रोहितचीही विक्रमावर नजर

दरम्यान, वॉर्नरने केलेल्या विश्वविक्रमावर रोहितचीही नजर आहे. रोहितलाही चेन्नईला सुरु असलेल्या सामन्यात वनडे वर्ल्डकपमध्ये १८ डावात १००० धावा पूर्ण करण्याची संधी आहे, पण त्यासाठी त्याला २२ किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची गरज आहे.

रोहितने वर्ल्डकपमध्ये सध्या १७ डावात ९७८ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता ही संधी रोहित साधणार का असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT