Dasun Shanaka Dainik Gomantak
क्रीडा

India Vs Sri Lanka: दासुन शनाकाने मोडले 'हे' दोन मोठे विक्रम, भारताविरुद्ध पहिल्यांदाच घडले

दैनिक गोमन्तक

India Vs Sri Lanka: भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना मेंडिस आणि शनाका यांच्या अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने 20 षटकांत 206 धावा केल्या. भारताला मालिका जिंकण्यासाठी 207 धावा कराव्या लागणार होत्या.

दरम्यान, श्रीलंकेकडून कर्णधार दासुन शनाकाने (Dasun Shanaka) नाबाद 56, कुसल मेंडिसने 52, पाथुम निसांकाने 33 आणि चरित अस्लंकाने 37 धावा केल्या. तर भारताकडून उमरान मलिकने तीन तर अक्षर पटेलने दोन बळी घेतले. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी एकूण 7 नो-बॉल टाकले. तर दासुन शनाकाने शानदार खेळी खेळत श्रीलंकेला (Sri Lanka) 200 धावांच्या पुढे नेले. दासुनने चमिकासोबत सातव्या विकेटसाठी अवघ्या 27 चेंडूत 68 धावांची भागीदारी केली. 22 चेंडूत 56 धावा करुन शनाका नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 6 षटकार मारले.

तसेच, भारताविरुध्दच्या (India) दुसऱ्या टी-20 सामन्यात अर्धशतकी खेळी खेळत शनाकाने दोन मोठे रेकॉर्ड मोडले. शनाका हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेकडून सर्वात ताबडतोब अर्धशतक ठोकणारा क्रिकेटर बनला आहे. त्याने श्रीलंकेचे पूर्व क्रिकेटर महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांना मागे सोडले आहे. ज्यांच्या नावावर ताबडतोब अर्धशतक झळकवण्याचा रेकॉर्ड होता. संगकाराने 21 चेंडूत अर्धशतक केले होते. तर जयवर्धनेने 2007 मध्ये जोहान्सबर्गमध्ये केनियाविरुध्द ही कामगिरी केली होती. तसेच, संगकाराने 2009 मध्ये नागपूरमध्ये भारताविरुध्द ही कामगिरी केली होती.

दुसरीकडे, 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने तीन षटकांत तीन विकेट गमावल्या. ईशान किशन (2), शुभमन गिल (5) आणि राहुल त्रिपाठी (5) पॉवरप्लेमध्येच बाद झाले. कर्णधार हार्दिक पांड्या 12 चेंडूत 12 धावा करुन बाद झाला. दीपक हुड्डा 12 चेंडूत 9 धावा करुन बाद झाला. यानंतर सूर्यकुमार आणि अक्षर पटेल यांनी झटपट अर्धशतके झळकावली. मात्र भारत सामन्यात पुनरागमन करेल असे वाटत असतानाच सूर्यकुमार 36 चेंडूत 51 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला.

दुसऱ्या T20 सामन्यात हा खेळाडू टीम इंडियासाठी सर्वात मोठा खलनायक ठरला

टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने पुण्यातील श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला संधी देऊन सर्वात मोठी चूक केली. अर्शदीप सिंगने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात अत्यंत खराब गोलंदाजी केली, त्याने 2 षटकात 37 धावा दिल्या आणि यादरम्यान त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात अर्शदीप सिंगने 5 नो-बॉल टाकले. अर्शदीपच्या या खराब गोलंदाजीचा फायदा घेत श्रीलंकेच्या फलंदाजांनी तूफान फटकेबाजी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT