India Vs Sri Lanka: दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेने मारली बाजी, भारताचा 16 धावांनी पराभव

India Vs Sri Lanka 2nd T20: पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेने भारताचा 16 धावांनी पराभव केला.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

India Vs Sri Lanka 2nd T20: पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेने भारताचा 16 धावांनी पराभव केला. या विजयासह श्रीलंकेने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारताने पहिला सामना दोन धावांनी जिंकला होता. गुरुवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्णधार दासून शनाका आणि कुसल मेंडिस यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने 20 षटकांत 6 गडी गमावून 206 धावा केल्या. प्रत्युत्तरात सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांच्या धमाकेदार अर्धशतकी खेळीनंतरही भारतीय संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 190 धावाच करु शकला.

दरम्यान, श्रीलंकेकडून (Sri Lanka) कर्णधार दासुन शनाकाने नाबाद 56, कुसल मेंडिसने 52, पाथुम निसांकाने 33 आणि चरित अस्लंकाने 37 धावा केल्या. तर भारताकडून उमरान मलिकने तीन तर अक्षर पटेलने दोन बळी घेतले. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी एकूण 7 नो-बॉल टाकले. दासुन शनाकाने शानदार खेळी खेळत श्रीलंकेला 200 धावांच्या पुढे नेले. दासुनने चमिकासोबत सातव्या विकेटसाठी अवघ्या 27 चेंडूत 68 धावांची भागीदारी केली. 22 चेंडूत 56 धावा करुन शनाका नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 6 षटकार मारले.

Team India
India Vs Sri Lanka: दासुन शनाकाने मोडले 'हे' दोन मोठे विक्रम, भारताविरुद्ध पहिल्यांदाच घडले

दुसरीकडे, 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने तीन षटकांत तीन विकेट गमावल्या. ईशान किशन (2), शुभमन गिल (5) आणि राहुल त्रिपाठी (5) पॉवरप्लेमध्येच बाद झाले. कर्णधार हार्दिक पांड्या 12 चेंडूत 12 धावा करुन बाद झाला. दीपक हुड्डा 12 चेंडूत 9 धावा करुन बाद झाला. यानंतर सूर्यकुमार आणि अक्षर पटेल यांनी झटपट अर्धशतकं झळकावली. मात्र भारत सामन्यात पुनरागमन करेल असे वाटत असतानाच सूर्यकुमार 36 चेंडूत 51 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला.

Team India
India vs Sri Lanka: राहुल द्रविडने दीपक चहरला दिला होता कानमंत्र

तसेच, भारताविरुध्दच्या (India) दुसऱ्या टी-20 सामन्यात अर्धशतकी खेळी खेळत शनाकाने दोन मोठे रेकॉर्ड मोडले. शनाका हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेकडून सर्वात ताबडतोब अर्धशतक ठोकणारा क्रिकेटर बनला आहे. त्याने श्रीलंकेचे पूर्व क्रिकेटर महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांना मागे सोडले आहे. ज्यांच्या नावावर ताबडतोब अर्धशतक झळकवण्याचा रेकॉर्ड होता. संगकाराने 21 चेंडूत अर्धशतक केले होते. तर जयवर्धनेने 2007 मध्ये जोहान्सबर्गमध्ये केनियाविरुध्द ही कामगिरी केली होती. तसेच, संगकाराने 2009 मध्ये नागपूरमध्ये भारताविरुध्द ही कामगिरी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com