Darshan Misal Dainik Gomantak
क्रीडा

Duleep Trophy: दक्षिण विभागात निवड झालेल्या गोव्याच्या एकमेव खेळाडूबद्दल माहिती आहे का?

आगामी दुलिप ट्रॉफी स्पर्धेसाठी दक्षिण विभागाच्या संघाची निवड करण्यात आली असून गोव्याच्या अनुभवी ऑलराऊंडरलाही संधी देण्यात आली आहे.

Pranali Kodre

South Zone Team for Duleep Trophy: भारतात आता देशांतर्गत क्रिकेटचा 2023-24 चा हंगाम 28 जूनपासून सुरू होत आहे. बंगळुरूमध्ये दुलीप ट्रॉफी स्पर्धेने या हंगामाला सुरुवात होईल. दरम्यान, विभागीय संघ पद्धतीने खेळलेल्या जाणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी दक्षिण विभागाच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे.

गोव्याच्या एका खेळाडूला संधी

दुलीप ट्रॉफी 2023 स्पर्धेसाठी दक्षिण विभागाच्या संघाचे कर्णधारपद हनुमा विहारीकडे सोपवण्यात आले आहे. तसेच उपकर्णधारपद मयंक अगरवालकडे सोपवण्यात आले आहे.

दुपील ट्रॉफीसाठी दक्षिण विभागीय संघात आंध्र प्रदेश, गोवा, हैदराबाद, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्य संघांमधील खेळाडूंची निवड केली जाते.

त्यामुळे दुलीप ट्रॉफी 2023 या प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण विभागाच्या संघातही या सर्व राज्य संघातील खेळाडूंची निवड झाली असून गोव्याच्या दर्शन मिसाळला संधी मिळाली आहे. अष्टपैलू खेळाडू असलेल्या 30 वर्षीय दर्शनला गोव्याकडून खेळण्याचा चांगला अनुभव आहे.

त्याने गेल्या हंगामात गोव्याकडून चांगली कामगिरीही केली होती. त्याने 2022-23 हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये 7 सामन्यात 54.50 च्या सरासरीने 436 धावा केल्या होत्या. त्याने 4 अर्धशतकेही केली होती. तसेच त्याने 22 विकेट्सही घेतल्या होत्या. याशिवाय विजय हजारे वनडे ट्रॉफीमध्ये त्याने 5 सामन्यांमध्ये 68.66 च्या सरासरीने 206 धावा केल्या होत्या.

दर्शनची कारकिर्द

दर्शनने वयाच्या 18 व्या वर्षी गोव्याच्या वरिष्ठ संघाकडून पदार्पण केले होते. त्याने 17 फेब्रुवारी 2011 रोजी आंध्रप्रदेशविरुद्ध लिस्ट ए सामन्यातून हे पदार्पण केले होते. त्यानंतर 2012 साली तो पहिल्यांदा गोव्याकडून प्रथम श्रेणी सामना खेळला, तर त्याच्या पुढच्याच वर्षी त्याला गोव्याच्या टी20 संघाकडून खेळण्याची संधी मिळाली.

डिसेंबर 2012 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या दर्शनने त्याच्या कारकिर्दीत 64 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 34.04 च्या सरासरीने 4 शतके आणि 18 अर्धशतकांसह 2852 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 112 विकेट्स घेतल्या आहेत.

त्याने 54 लिस्ट ए सामने खेळले असून 27.32 च्या सरासरीने 1 शतक आणि 6 अर्धशतकांसह 1093 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 50 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 61 टी20 सामन्यांमध्ये 544 धावा केल्या आहेत आणि 47 विकेट्स घेतल्या आहेत.

या खेळाडूंनाही संधी

दरम्यान, दुलीप ट्रॉफी 2023 स्पर्धेसाठी दक्षिण विभागाच्या संघात मिसाळव्यतिरिक्त केरळच्या सचिन बेबी, हैदराबादच्या तिलक वर्मा यांना संधी मिळाली आहे. तसेच विहारी व्यतिरिक्त आंध्र प्रदेशच्या रिकी भूई, यष्टीरक्षक केएस भरत आणि केव्ही शशिकांत यांनाही संधी देण्यात आली आहे. केएस भरत नुकताच कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळून आला आहे.

त्याचबरोबर कर्नाकटच्या मयंक अगरवालशिवाय आर समर्थ, व्ही कावेरप्पा, विजयकुमार वैशाख यांना संधी मिळाली आहेत, तर तमिळनाडूचे साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर, प्रदोष रंजन पॉल, साई किशोर यांना संधी मिळाली आहे.

याशिवाय गोव्याच्या सुयश प्रभूदेसाईला राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, दक्षिण विभागीय संघाच्या निवड समितीची बैठक मंगळवारी गोव्यात झाली होती.

विहारीचे पुनरागमन

या स्पर्धेतून विहारी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. त्याला रणजी ट्रॉफी 2022-23 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मध्यप्रदेशविरुद्ध खेळताना आवेश खानचा चेंडू लागल्याने दुखापतग्रस्त झाला होता.

दक्षिण विभाग संघ

हनुमा विहारी (कर्णधार), मयांक अगरवाल (उपकर्णधार), साई सुदर्शन, रिकी भुई, केएस भारत, आर. समर्थ, वॉशिंग्टन सुंदर, सचिन बेबी, प्रदोष रंजन पॉल, साई किशोर, व्ही. कावेरप्पा, विजयकुमार वैशाख , केव्ही शशिकांत, दर्शन मिसाळ, तिलक वर्मा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT