बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Common wealth Games) भारतीय कुस्तीपटूंनी कुस्तीमध्ये धाकड कामगिरी करणे सुरूच ठेवले आहे . भारतीय कुस्तीपटू नवीन कुमारने (Naveen Kumar) फ्रीस्टाइल 74 किलो गटात पाकिस्तानच्या मुहम्मद शरीफ ताहिरचा 9-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. कुस्तीतील भारताचे (India) हे सहावे सुवर्ण आहे. (Naveen Kumar Wins Gold News)
नवीन कुमारने 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला 12 वे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याचबरोबर कुस्तीतील भारताचे हे सहावे सुवर्णपदक आहे. याआधी आज रवी दहिया आणि विनेश फोगट यांनी वेगवेगळ्या वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे.
* विनेश फोगटने सुवर्णपदक जिंकले
भारताची ज्येष्ठ कुस्तीपटू विनेश फोगटने तिसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले . त्याने 53 किलो फ्रीस्टाइलमध्ये श्रीलंकेच्या चामोदय केशानीचा पराभव केला. विनेशने हा सामना 4-0 ने जिंकला. तिने 2014 ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये 48 किलो गटात आणि 2018 कॉमनवेल्थ गेम्समध्ये 50 किलो गटात सुवर्णपदक जिंकले.
पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत अभिनंदन केले आहे.
रवी दहियानेही सुवर्णपदक जिंकले
भारताचा स्टार कुस्तीपटू रवी कुमार दहिया याने राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच पदक जिंकले आहे. त्याचे पहिले पदक सुवर्ण आहे. रवीने फ्रीस्टाइल 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत नायजेरियाच्या अबिकवेनिमो विल्सनचा 10-0 असा पराभव केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.