Croatia vs Belgium Dainik Gomantak
क्रीडा

Croatia vs Belgium: बेल्जियमने गमावली बाद फेरीची संधी

सामना गोलशुन्य बरोबरीत; क्रोएशिया आरामात पुढील फेरीत

Akshay Nirmale

Croatia vs Belgium: फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतील ग्रुप एफ मधील दुसऱ्या सामन्यात गत उपविजेता क्रोएशिया आणि बेल्जियम हे दोन संघ एकमेकांना भिडले. दोन्ही संघांना पुर्णवेळेत आणि भरपाई वेळेतही गोल नोंदवता आला नाही. त्यामुळे सामना गोलशुन्य बरोबरीत राहिला.

(FIFA World Cup 2022)

पुर्वार्धात दोन्ही संघांची गोलची पाटी कोरीच राहिली. बेल्जियमच्या खेळाडुंनी 60 व्या मिनिटाला चांगली मुव्ह केली होती. पण त्याचे रूपांतर गोलमध्ये करण्यात त्यांना यश आले नाही. रोमेलू लुकाकू याच्यासमोर गोलजाळी अगदी रिकामी होती. पण त्याने फटकावलेला शॉट गोलपोस्टला लागून परतला. त्यामुळे बेल्जियमचा गोल होता होता राहिला.

बेल्जियमच्या करास्को याने क्रोएशियाचा स्ट्रायकर क्रेमेरिज याला पेनल्टी बॉक्समध्ये पाडले. त्यामुळे क्रोएशियाला 15 व्या मिनिटाला पेनल्टी किक मिळाली. लुका मोद्रिच पेनल्टीसाठी तयार झाला होता, पण व्हीएआर ने हा निर्णय फिरवला. क्रोएशियाचा एक खेळाडू ऑफसाईड असल्याचे दिसून आले, त्यामुळे क्रोएशियाला आघाडीपासून वंचित राहावे लागले.

दरम्यान, या सामन्यापुर्वी ग्रुप एफ मध्ये क्रोएशिया आणि मोरक्को प्रत्येकी चार गुणांसह पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर होते. त्यामुळे क्रोएशिया संघाला हा सामना अनिर्णित राहिला तरी एक गुण मिळून त्यानुसार गुणांनुसार त्यांना बाद फेरीत पोहचता आले असते. तर बेल्जियमला या सामन्यात कुठल्याही परिस्थइतीत विजय आवश्यक होता. तरच त्यांना पुढील फेरीत प्रवेशाची संधी होती. बेल्जियमचे तीन गुण होते. तर कॅनडा आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT