PAK vs ENG: शानदार, जबरदस्त! दिवसभरात 4 शतके, 500 धावा; 112 वर्षे जुना रेकॉर्ड मोडला

PAK vs ENG 1st Test: पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे गुरुवारी (1 डिसेंबर) ऐतिहासिक इंग्लंड-पाकिस्तान कसोटी मालिकेला सुरुवात झाली.
 England Team
England TeamDainik Gomantak
Published on
Updated on

PAK vs ENG 1st Test Match: पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे गुरुवारी (1 डिसेंबर) ऐतिहासिक इंग्लंड-पाकिस्तान कसोटी मालिकेला सुरुवात झाली. या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने 4 गडी गमावून 506 धावा करुन जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. इंग्लंडच्या या खेळीदरम्यान पाकिस्तानचे गोलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसले. त्याचबरोबर इंग्लंडकडून पहिल्या दिवसाच्या डावात 4 खेळाडूंनी शतके झळकावली.

145 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले

145 वर्षांच्या इतिहासात इंग्लंड संघ कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी 500 धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला संघ बनला आहे, तर 112 वर्षे जुना विक्रमही मोडीत काढला आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी 500 धावा करणारा इंग्लंडचा संघ पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी 1910 मध्ये ऑस्ट्रेलियाने (Australia) कसोटीच्या पहिल्या दिवशी 494 धावा केल्या होत्या. इंग्लंडने 112 वर्षे जुना विक्रम मोडीत काढत मोठी कामगिरी केली आहे.

 England Team
Eng vs Pak: पाकिस्तानातील पूरग्रस्तांसाठी धावून आला इंग्लंडचा कर्णधार! जाणून घ्या

पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई

इंग्लंडचा संघ 17 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये (Pakistan) कसोटी मालिका खेळण्यासाठी आला आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. इंग्लंडच्या सलामीवीरांनी धमाकेदार सुरुवात केली आणि लंच ब्रेकपर्यंत 174 धावा ठोकल्या. जो विश्वविक्रम ठरला. या सामन्यापूर्वी हा विश्वविक्रम टीम इंडियाच्या नावावर होता. 2018 मध्ये भारताने अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या सत्रात विकेट न गमावता 158 धावा काढल्या होत्या.

 England Team
ENG vs PAK: पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तर म्हणाला...

आघाडीच्या 5 फलंदाजांपैकी 4 फलंदाजांनी शतकी खेळी केली

पहिल्या दिवशी इंग्लंडकडून जॅक क्रॉली, बेन डकेट, तिसर्‍या क्रमांकावर ऑली पोप आणि पाचव्या क्रमांकावरील हॅरी ब्रूक यांनी शतके झळकावली. संघाचे सलामीवीर जॅक क्रोली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 35.4 षटकांत 233 धावांची भागीदारी केली. त्याचवेळी इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट 23 धावा करुन बाद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com