Cristiano Ronaldo (Cristiano Ronaldo Instagram)
क्रीडा

क्रिस्टियानो रोनाल्डोच्या कारचा अपघात, 16 मिलियन बुगाटीचा चक्काचूर

स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर आणखी एक संकट ओढवले आहे.

दैनिक गोमन्तक

स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर आणखी एक संकट ओढवले आहे. सुटी एंजॉय करण्यासाठी माजोर्का येथे आलेला दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 16 कोटी रुपयांच्या बुगाटी वाहनाला अपघात झाला. अपघातात कारचा पूर्ण चुराडा झाला मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. अपघाताच्या वेळी गाडीत रोनाल्डोचा एकच अंगरक्षक उपस्थित होता.

क्रिस्टियानो रोनाल्डो मँचेस्टर खराब हंगामानंतर वातावरण बदलासाठी सध्या देशाबाहेर आहे. तो आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत मजोरका येथे वेळ घालवत आहे. त्याला आपली गाडी तिथे फिरण्यासाठी आणायची होती, जिचा अपघात झाला.

रोनाल्डोचा बॉडीगार्ड कार चालवत होता आणि अपघाताच्या वेळी कारमध्ये तो एकटाच होता. त्याचे नियंत्रण सुटले होते. कारच्या पुढील भागाचा चुराडा झाला. या अपघातात अन्य कोणत्याही वाहनाचा सहभाग नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. चालकानेच अपघाताची माहिती दिली

'कार भिंतीवर आदळली मात्र चालकाला दुखापत झाली नाही. अपघाताची संपूर्ण जबाबदारी चालकाने घेतली. ही कार रोनाल्डोच्या नावावर असून याच नावाने पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली आहे. 2016 मध्ये युरो कप जिंकल्यानंतर रोनाल्डोने ही कार खरेदी केली होती.

बुगाटी हा रोनाल्डोच्या लक्झरी कार कलेक्शनचा एक भाग आहे. त्याच्या संग्रहात अॅस्टन मार्टिन, बेंटले आणि फेरारी मॉन्झा यांचाही समावेश आहे. त्याने काही काळापूर्वी त्याच्या विशेष संग्रहात 66 कोटी रुपयांची मर्यादित आवृत्ती बुगाटी समाविष्ट केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dacoity in Baina: डोक्यात वार, लहान मुलीलाही मारहाण; 'रॉड' आणि 'सुरा' घेऊन 7 हल्लेखोर घरात, बायणात मध्यरात्री भीषण दरोडा

Goa ZP Election: पैंगीणमध्‍ये तिरंगी लढतीची शक्‍यता! राजकीय समीकरणे बदलू लागली; प्रचारात गोवा फॉरवर्डची आगेकूच

Porvorim: सर्वत्र धूळच धूळ! पर्वरी महामार्गावरील वाढती समस्या; वाहनचालकांसाठी प्रवास त्रासदायक

Tivrem Vargao: 2 गटांत रंगली चुरस! तिवरे–वरगावात सत्तासंघर्षाचा विस्फोट; सरपंच–उपसरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर

Horoscope: प्रॉपर्टी होणार नावावर, कामासाठी होणार प्रवास; 'या' राशींसाठी आजचा दिवस खास

SCROLL FOR NEXT