अश्विन कोरोना पॉजिटीव्ह; कसोटी सामना खेळणार की नाही?

भारताचा दिग्गज फिरकीपटू अश्विन इंग्लंडला पुढील सामन्यासाठी गेलेला नाही.
Ravichandran Ashwin
Ravichandran AshwinDainik Gomantak
Published on
Updated on

भारताचा दिग्गज फिरकीपटू अश्विन (Ravichandran Ashwin) इंग्लंडला पुढील सामन्यासाठी गेलेला नाही. खरेतर भारतीय फिरकीपटू अश्विनला कोरोना झाला आहे, त्यामुळे तो इंग्लंडला जाऊ शकलेला नाही. अश्विन सध्या क्वारंटाईनमध्ये आहे आणि सर्व प्रोटोकॉल पूर्ण केल्यानंतरच तो संघात सामील होणार आहे. भारतीय कसोटी संघ 16 जून रोजी यूकेला रवाना झाला आहे. (According to the BCCI Ravichandran Ashwin Corona is positive so he could not go to England)

Ravichandran Ashwin
राष्ट्रीय योग ऑलिंपियाडमध्ये गोव्याला रौप्य

अश्विनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळल्याने तो संघासह यूकेला जाऊ शकलेला नाही. कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी अश्विन वेळेत बरा होईल, अशी अपेक्षा आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 1 जुलैपासून मालिकेतील शेवटचा कसोटी सामना खेळला जाईल. कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ लीसेस्टरशायरविरुद्ध (Leicestershire County Cricket Club) सराव सामना खेळणार असला तरी अश्विन यापुढे या सराव सामन्यात सहभागी होऊ शकणार नाहीये.

उर्वरित संघ आधीच लीसेस्टरमध्ये असून गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांच्या देखरेखीखाली त्यांनी प्रशिक्षण सुरू केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका संपवून राहुल द्रविड, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर लंडनला पोहोचले आहेत आणि मंगळवारी लीसेस्टरला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नेतृत्वाखालील आयर्लंडला जाणारा संघ 23 किंवा 24 जून रोजी डब्लिनला रवाना होईल कारण संघातील खेळाडूंना तीन दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com