Cristiano Ronaldo Dainik Gomantak
क्रीडा

Cristiano Ronaldo: अल नासरसाठी पहिला गोल नोंदवताच रोनाल्डोची पोस्ट चर्चेच, पाहा काय म्हणाला

अल-नासरसाठी पहिला गोल नोंदवल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोने एका स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

Pranali Kodre

Cristiano Ronaldo: दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आता युरोपियन फुटबॉलकडून आशियाई फुटबॉलकडे वळला आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी सौदी अरेबियामधील अल-नासर क्लबशी करार केला आहे. आता त्याने या संघाकडून खेळण्यास सुरुवात केली असून पहिला गोलही नोंदवला आहे. त्याबद्दल त्याने पोस्ट करत आनंद व्यक्तही केला आहे.

सौदी प्रो लीगमध्ये शुक्रवारी अल-नासर संघाचा सामना अल फतेह संघाविरुद्ध झाला. हा सामना 2-2 अशा गोल फरकाने बरोबरीत संपला. या सामन्याच्या भरपाई वेळेत रोनाल्डोने गोल करत संघाला बरोबरी करून दिली होती. हा रोनाल्डोचा अल-नासरसाठी पहिला गोल ठरला.

याबद्दल रोनाल्डोने पोस्ट शेअर केली आहे. त्याने त्याचे काही फोटो शेअर केले असून लिहिले आहे की 'सौदी लीगमध्ये पहिला गोल केल्याबद्दल मी आनंदी आहे. एका कठीण सामन्यात महत्त्वपूर्ण बरोबरी साधण्यासाठी संपूर्ण संघाने चांगले प्रयत्न केले.'

रोनाल्डोच्या या पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. त्याचे अनेकांनी अभिनंदनही केले आहे.

या सामन्यात अल फतेहकडून ख्रिस्तियन टलाने 12 व्या मिनिटालाच गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली होती. पण नंतर पहिला हाफच्या अखेरीस 42 व्या मिनिटाला तालिस्काने गोल नोंदवला आणि अल-नासरला बरोबरी साधून दिली.

मात्र, सोफियान बेनडेबकाने दुसऱ्या हाफची सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच सामन्याच्या 58 व्या मिनिटाला गोल केला आणि पुन्हा अल-फतेहला आघाडीवर आणले. पण अखेर भरपाई वेळेत 93 व्या मिनिटाला पेनल्टीवर रोनाल्डोने अचूक निशाणा साधत त्याच्या अल-नासर संघाला बरोबरी साधून दिली. दरम्यान, रोनाल्डो या सामन्यात 2 वेळा गोल करण्यात चूकला होता.

रोनाल्डोने गेल्यावर्षाच्या अखेरीस मँचेस्टर युनायटेड क्लबपासून मार्ग वेगळा करण्याचा निर्णय घेतला होता. मँचेस्टर युनायटेड आणि रोनाल्डो यांनी परस्पर संमतीने त्यांच्यातील करार संपवला होता. रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायडेट क्लब यांच्यातील वाद मध्यंतरी समोर आले होते. त्यानंतरच ते वेगळे झाले.

त्यानंतर त्याने अल-नासरशी अडीच वर्षांचा करार केला. त्याने 200 मिलियन युरोचा अल नासरशी करार केला असल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT